समय रैनाचा इंडियाज गाॅट लेटेंट या शोचा आणखी एक बोनस एपिसोड आला आहे. आणि या दरम्यान या शो मध्ये आयुष्यमान खुराना पॅनलमध्ये सहभागी झाला होता. तसेच या व्यतिरिक्त समयसोबत मेंटॅलिस्ट सुहानी शाह, कॉमेडियन आदित्य कुलश्रेष्ठ आणि कॉमेडियन रजत सूद हे सुध्दा पॅनल मध्ये होते. तर या समयने त्याच्या युट्युब चॅनलवर याच्या प्रदर्शनाची घोषणा करताना समयने लिहले, बोनस एपिसोड 4 फक्त सदस्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच हा एपिसोड 34 मि. 13 सेकंदांचा असुन ते सध्या फक्त युट्युब सदस्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच या एपिसोड मध्ये आयुष्यमानची एक अनोखी बाजु दिसुन येत आहे.
समय (Samay)रैनाच्या या शो दरम्यान अनेक सेलिब्रिटी पाहुणे येउन गेले आहेत. तसेच आता या भागात समयने आयुष्मानला बोलवले होते. एका क्षणी, समयने आयुष्मानच्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाबद्दल विनोद करत म्हटले, “मी पण तुझा ‘पती, पत्नी और वो’ हा चित्रपट पाहिला, आणि ‘वो’ म्हणजे माझ्यासोबत हा चित्रपट पाहायला आलेले दे दोघे. तर आता त्याचे पैसे परत हवे आहेत. यामुळे आयुष्मान आणि प्रेक्षक हसले.
समय रैनाचा हा इंडियाज गॉट लेटंट’च्या सीझन 2 रोजयचे एपिसोड आणि विशेष भाग तुम्ही युट्युब आणि नेटफ्लिक्सवर पाहु शकता या एपिसोड मध्ये अनेक दिग्गज कलाकार म्हणजेच आलिया भट्टपासून वरुण धवनपर्यंत, राघव जुयालपासून शर्वरीपर्यंत अनेक कलाकार या सीझन 2 मध्ये दिसले आहेत.
आयुष्मान याच्या कामाबाबत पाहायचे झाल्यास तो त्याच्या ‘उडता तीर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. तसेच उडता तीर त्याचा हा चित्रपट 9 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज होत आहे. आणि चित्रपटात राहुल बोस, राम कपूर, सुहेल नय्यर, गुलशन ग्रोव्हर, मुकुल देव, रघुबीर यादव, ब्रिजेंद्र काला, संदीप आनंद, सुप्रिया पिळगावकर आणि स्मिता तांबे हे दिग्गज कलाकार पाहायला मिळतील.
हेही वाचा
द वनची बॅाक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड, सिद्धार्थ-तमन्नाच्या सिनेमाने 2 दिवसांत कमावले इतके कोटी










