मराठीमोळी अभिनेत्री मानसी नाईक आजकाल तिच्या इंस्टाग्राम व्हिडिओमुळे खूप चर्चेत असते. तिचे व्हिडिओ पोस्ट होता क्षणीच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. याशिवाय चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओला खूप प्रेमही देतात. अभिनेत्रीने आपल्या नृत्यकेलेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे.
आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयावर वार केला आहे. तिने तिचा व्हिडिओ शेअर करून, पुन्हा सोशल मीडियावर चर्चा रंगवल्या आहेत. मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती प्रथम वेस्टर्न आणि स्टायलिश लूकमध्ये दिसते. तर दुसऱ्या लूकमध्ये लगेचच अभिनेत्री पारंपारिक वेशभूषेत दिसते. विशेष म्हणजे या दोन्ही लूकमध्ये मानसी कमालीची सुंदर दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत मानसीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “लिखा है डॉक्टरने दवाई की जगह तुम्हारा नाम, और ये भी लिखा है सुबह दोपहर शाम.” यात मानसी बादशाहच्या ‘पानी पानी’ या गाण्यावर आपल्या अदा दाखवताना दिसली आहे. तिचा हा अंदाज कोणालाही वेड लावायला पुरेसा आहे. यावर तिचा पती प्रदीप खरेरानेही त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. कमेंट करत प्रदीप म्हणतोय की, “या कॅप्शनने तर माझा जीवच घेतला!”
मानसीने असा व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही तिने बऱ्याचदा असे व्हिडिओ शेअर करून, चाहत्यांना भुरळ पाडली आहे. तुम्ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटला भेट दिली, तर तुम्हाला ते तिच्या व्हिडिओने आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले दिसेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर
-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट