नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ मधील ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात आजकाल खूपच लाईमलाईटमध्ये राहते. ‘फँड्री’ मध्ये जब्या आणि शालूची प्रेमकथा खूपच गाजली. विशेष म्हणजे, चित्रपटात एकही डायलॉग न बोलता, राजेश्वरीने केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. यामुळे तिच्या खऱ्या नावपेक्षा चित्रपटातील नावाने तिला अधिक ओळखले जाते. मात्र आता ती तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना भांबावून सोडत आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. चाहत्यांकडून तिचे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहिले जातात. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
वास्तविक हा एक डान्स व्हिडिओ आहे, जो राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती ‘मस्त चाललंय आमचं’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, शालूने काळ्या रंगाची कुर्ती आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. यातील तिचे मूव्ह्ज आणि चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही अतिशय परफेक्ट आहे. (rajeshwari kharat shared dance video on mast chalalay aamch song see here)
गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी सतत तिचे डान्स व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडूनही खूप पसंत केले जाते. नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ देखील त्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडिओ शेअर होता क्षणीच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. थोड्याच वेळापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला लगेचच ८ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे. सोबतच नेटकरी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यामी गौतमची बहीण सुरिलीने केला तिचा साज श्रृंगार; अभिनेत्रीने केला लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ