बॉलिवूड कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यवसायिक आयुष्य असो, प्रत्येक गोष्टीची माहिती प्रेक्षकांपर्यँत पोहचत असते. त्यांनी याबाबत कोणतीही गोपनीयता ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही चाहत्यांना त्यांची प्रत्येक माहिती समजत असते. यातच बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या अफेअरच्या बातम्या समोर येत होत्या. माध्यमातील वृत्तानुसार ते दोघेही मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.
अशातच मलायकाने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला आहे. तिच्या चाहत्याना तिची ही पोस्ट खूप आवडली आहे. या पोस्टमध्ये मलायकाने अर्जुनसाठी एका खास लाईन लिहिली आहे. तिने अर्जुन कपूरचा एका फोटो शेअर केला आहे.
तुम्ही पाहू शकता की, मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये अर्जुन सोफ्यावर बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझे रविवारचे दृश्य.” यासोबतच तिने एका हार्ट इमोजी देखील पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट सर्वांना खूप आवडली आहे.

मलायकाने २०१७ साली अरबाज खानसोबत लग्न केले होते. परंतु काही कारणांनी ते दोघे वेगळे झाले. त्या दोघांना एका मुलगा देखील आहे. त्यानंतर तिच्या आणि अर्जुनच्या अफेअरच्या बातम्या यायला लागल्या होत्या. मलायका ही अर्जुनपेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे ते खूप ट्रोल होतात. मलायका बॉलिवूडमधील एका उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने अनेक आयटम सॉंग्समध्ये डान्स केला आहे. तसेच तिने अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










