Wednesday, July 8, 2026
Home कॅलेंडर एका वर्षात इतके बदलले रियाचे आयुष्य, जेल मधून बाहेर तर पडली पण आता राहायला घरही नाही!

एका वर्षात इतके बदलले रियाचे आयुष्य, जेल मधून बाहेर तर पडली पण आता राहायला घरही नाही!

कोरोनामुळे सरणारे वर्ष कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहणारच आहे. शिवाय अनेक कलाकारांनी यावर्षी आपली साथ सोडल्याने सुद्धा २०२० आपल्या लक्षात राहणार आहे. मात्र अभिनेत्री रिया चक्रवर्ती साठी २०२० तर तिचे आयुष्यच बदलवणारे ठरले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला मुख्य संशयतीत आरोपी ठरवण्यात आले. त्यानंतर तिचे आयुष्य अचानक बदलले.

सुशांतसिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक रुमी जाफरी याने नुकतेच सांगितले आहे की, “मी नुकताच रियाला भेटून आलो. मी रियाला विश्वास दिला की लवकरच सर्व गोष्टी पहिल्या सारख्या होतील. रुमीने सांगितले की, ह्या सर्व घटनांनंतर रिया खूप शांत झाली आहे, खूप कमी बोलते. मी तिला सांगितले जे काही झाले त्यात तुझा काहीच दोष नाही, जस जशी परिस्थिती बदलेल तसे तुला आपली इंडस्ट्री खुल्या हाताने आपलं करेल. मागचे वर्ष रियासाठी खूप त्रासदायक ठरले. नक्कीच २०२० सर्वाना कठीण गेले, पण रियासाठी जास्तच वाईट ठरले. तुम्हीच विचार करा एका मध्यमवर्गीय मुलीला विनाकारण एक महिना जेल मध्ये राहावे लागल्याने तिने तिचा संपूर्ण आत्मविश्वास गमावला आहे. २०२१ मध्ये लवकरच रिया पुन्हा कामावर परतेल. रियाचा एक सिनेमा आधीच तयार आहे, मात्र तो अदयाप प्रदर्शित होणार नाही.”

तत्पूर्वी रुमी जाफरी यांचे दिग्दर्शन असलेला ‘चेहेरे’ हा सिनेमा २०२० मधेच प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन लांबले. आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये. या सिनेमात अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसुझा सारखे कलाकार असले तरी रिया चक्रवर्तीच्या चित्रपटात असण्यामुळे या सिनेमाला विरोध होऊ शकतो. कदाचित त्याचमुळे अजूनही या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत पक्की माहिती मिळत नाहीये.

इकडे रिया चित्रपटात पुनरागमन करत असल्याच्या बातम्या येत असतांना दुसरीकडे रिया आणि तिचे कुटुंब मुंबईत घर शोधत आहे. सध्या रिया राहत असलेल्या घरातून त्यांना बाहेर पडायला सांगितले आहे. मीडियाचा चोवीस तास असणाऱ्या गराडयांमुळे तिथल्या रहिवाशांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे आता रियाचे कुटुंब घर शोधत आहे.
रुमी जाफरीने सांगितले की, “मागच्या डिसेंबर महिन्यात आम्ही ‘चेहेरे’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्यामुळे आम्ही सर्व खूप खुश होतो, मात्र ह्यावर्षी रिया संपूर्ण बदलली आहे. हसत खेळत असणारी रिया अचानक शांत झाली आहे. जेल मधून तर रिया परत आली मात्र तिचे हसू परत नाही आले.”

हे देखील वाचा