Saturday, April 4, 2026
Home कॅलेंडर वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हिना खानने शेअर केला भावुक व्हिडिओ; डोळ्यात अश्रू घेऊन आईने कापला केक

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हिना खानने शेअर केला भावुक व्हिडिओ; डोळ्यात अश्रू घेऊन आईने कापला केक

असे म्हणतात की, या जगात अटळ अशा दोनच गोष्टी आहेत, आणि त्या म्हणजे जन्म आणि मृत्य. या दोन्हीही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपली जवळची व्यक्ती निघून गेली की, आपल्याकडे आयुष्यभर फक्त आणि फक्त आपल्याकडे राहतात त्या व्यक्तीच्या आठवणी. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेली हिना खान देखील तिच्या दिवंगत वडिलांच्या आठवणीत रमलेली दिसत आहे.

हिना खानने नुकताच तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला असून, त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, जो पाहून सगळ्यांना नक्कीच भरून येईल. हिनाने तिच्या वडिलांचा वाढदिवस केक कापत साजरा केला. वडिलांच्या ठिकाणी तिने आईला उभे करत तिच्याकडून केक कापला. हा केक कापत असताना तिच्या आईच्या डोळ्यातील पाणीच थांबत नव्हते. याचाच व्हिडिओ तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी तिने तिच्या वडिलांच्या आवडीची फुले देखील आणली होती. हे सर्व तिने सोशल मीडियावर शेअर करत असताना तिने एक संदेश देखील लिहिला आहे. (hina khan celebrated her late father birthday)

तिने तिच्या संदेशामध्ये म्हटले आहे की, “हे एक असे नुकसान आहे, जे विचार करण्याच्या पलीकडचे आहे. जे आपल्याला आपल्या आयुष्यातील खऱ्या मात्र कटू सत्याची माहिती देते. याही परिस्थितीत आपल्याला धैर्य आणि ताकद टिकवणे खूप आवश्यक आहे. मला ही क्षमता नक्कीच माझ्या आईपासून मिळाली आहे. मी विचार देखील करू शकत नाही आणि मी एवढे मजबूत अजून कोणाला ओळखत देखील नाही. त्यांनी हा वाढदिवस साजरा करण्याचा आणि त्याच्याऐवजी स्वतः केक कापण्याचा निर्णय घेतला. माझी आई माझ्यासाठी ताकदीचा स्रोत आणि प्रेरणा दोन्हीही आहे.”

पुढे हिनाने लिहिले, “आधी मी माझ्या आईचा हा रडतानाचा व्हिडिओ पोस्ट न करण्याचे ठरवले होते, ती अजूनही या दुःखातून बहर येण्याचा प्रयत्न करत आहे. जसे आपण सर्वच आपल्या खऱ्या भावनांचा अनुभव घेतो. तसेच सोशल मीडियावरील माझी उपस्थिती तेवढीच खरी पाहिजे. म्हणूनच मी हा व्हिडिओ पोस्ट केला. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करेल, आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करू बाबा.”

याचवर्षी हिनाने तिच्या वडिलांना गमावले. २० एप्रिल, २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा