सोशल मीडियावर सक्रिय अभिनेत्रींच्या यादीत सर्वात वर नाव येते ते अभिनेत्री जान्हवी कपूरचे. जान्हवी तिच्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीचे अपडेट सोशल मीडियावर देत असते. तिच्या फोटोशूटचे फोटो, व्हिडिओ, सेटवरील फोटो आदी अनेक गोष्टी ती सतत पोस्ट करताना दिसते. नुकताच जान्हवीने तिचा फुल्ल ऑन मस्तीने भरलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
जान्हवीने नुकताच तिचा अक्सा गॅंगसोबतच व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. याआधी देखील तिने असे मस्तीने परिपूर्ण असे धमाल व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केले आहेत. मात्र या व्हिडिओची काही बातच निराळी आहे. या व्हिडिओमध्ये तिची अक्सा गॅंग ‘कयामत कयामत’ या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिचे मित्र कधी बाथरूममध्ये, कधी बाथटबमध्ये, कधी बेडरूममध्ये तर कधी कपाटात फुल्ल दंगा घालत आहे.
‘कयामत कयामत’ या गाण्यातील शब्दांना हटके पद्धतीने दर्शविताना देखील ते दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाचा बॉडीकॉन जंपसूट घातलेला असून, यात ती खूपच आकर्षक दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने लिहिले, “अक्सा गॅंग ठीक आहे, सादर करत आहोत आमचा फायनल व्हिडिओ. मी तुम्हाला वचन देते हा व्हिडिओ कयामत आहे.”
जान्हवीच्या या व्हिडिओवर तिचा भाऊ अर्जुन कपूरसोबत, काजल अग्रवाल आदी अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. शिवाय फॅन्सने देखील मजेशीर कमेंट्स करत जान्हवीला विचारले आहे की, ‘या गँगमध्ये आम्ही कसे प्रवेश करू शकतो.’, तर काहींनी तिला ‘तुम्ही बेस्ट आहात’ असे सांगितले आहे. नुकतेच जान्हवी आणि अर्जुनचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती राजकुमार रावसोबत ‘रुही’ या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा तुफान गाजला. आगामी काळात लवकरच ती ‘गुड लक जैरी’, ‘दोस्ताना २’ आणि ‘मिली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल










