Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड प्रियांका, कॅटरिना आणि आलिया हे त्रिकुट निघणार रोड ट्रीपवर, फरहान अख्तरने केली पुढच्या सिनेमाची घोषणा

प्रियांका, कॅटरिना आणि आलिया हे त्रिकुट निघणार रोड ट्रीपवर, फरहान अख्तरने केली पुढच्या सिनेमाची घोषणा

बॉलिवूडबद्दल नेहमी असे म्हटले जाते की, इथे फट प्रेम कहाण्यांवर आधारितच सिनेमे बनतात. त्यामुळे अनेकदा हे सिनेमे ट्रोल देखील केले गेले आहेत, मात्र काळ बदलला तसे चित्रपटांचे रुपडे देखील पालटले. पूर्वी फक्त लव्हस्टोरीबद्दल सीमित असणारे हिंदी सिनेमे आता हॉलिवूड सिनेमांना देखील जोरदार टक्कर देतात. अतिशय वेगळे, पठडीबाहेरील विषयदेखील उत्तम पद्धतीने बॉलिवूडमध्ये दाखवले जातात. काही वर्षांपासून तर स्त्रीकेंद्रित अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता असाच एक महिलांवर आधारित नवीन सिनेमा तयार होत आहे.

तुम्हाला २०११ साली आलेला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा सिनेमा आठवत असेलच. आता याच चित्रपटाचे फिमेल व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव असणार आहे, ‘जी ले जरा.’ आलिया भट्टने नुकताच याचा एक छोटा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक गाडी दिसत असून त्यातच रास्ता देखील दिसत आहे. त्यावरून हा सिनेमा गर्ल्स रोड ट्रीपवर आधारित असणार आहे हे नक्की.

या चित्रपटात प्रियांका चोप्रा-जोनास, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता, दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून, जोया अख्तरने या सिनेमाची कथा लिहिली आहे. याबद्दल फरहानने देखील एक पोस्ट शेअर करत लिहिले, “कोणी रोड ट्रिपबद्दल बोलले का?, आज मला माझ्या पुढच्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. माझ्या ‘दिल चाहता है’ सिनेमाला २० वर्ष पूर्ण होत आहेत. यापेक्षा वेगळा आणि चांगला दिवस कोणताही नसेल हे सांगायला. प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘जी ले जरा’ चित्रपटाची शूटिंग २०२२ मध्ये सुरु होईल.”

तत्पूर्वी २०११ साली ‘जिंदगी ना मिलेगी’ दोबारा हा सिनेमा आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही तुफान प्रतिसाद दिला. अनेक पुरस्कार आणि तिकीट खिडकीवर बक्कळ कमाई केलेला हा सिनेमा आजही तेवढ्याच आवडीने आणि आनंदाने पाहिला जातो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

 

हे देखील वाचा