Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

हॉटनेसचा तडका! टीना दत्ताच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पांढऱ्या मोनोकनीत दिल्या हटके पोझ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे टीना दत्ता. टीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे बोल्ड अंदाजात फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिचे नवनवीन फोटो बघण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच तिने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी आग लावली आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

टीना दत्ताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाची मोनोकनी घातली आहे. तिने तिच्या केसांची पोनीटेल बांधली आहे. तसेच तिने यावर न्यूड मेकअप केला आहे. या फोटोमध्ये ती तिची बॉडी स्ट्रेच करताना दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज नेहमी प्रमाणेच तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत ५० हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत, तर तिचे चाहते सातत्याने या फोटोंवर कमेंट करत आहेत. (tina datta’s bold photo viral on social media)

नुकतेच काही दिवसांपूर्वी टिनाने मासे विकताना आणि भाजी विकताना फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

तिच्या त्या फोटोंवरही तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकजण “तुझ्यावर एवढी वाईट वेळ आली आहे का?,” असे तिला विचारत होते.

टीना दत्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘परिणीता’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. परंतु तिला ‘उतरण’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली. या मालिकेतील तिचे पात्र खूप गाजले होते. या नंतर तिने ‘कॉमेडी सर्कस का नया दौर’, ‘कॉमेडी क्लासेस’, ‘कर्मपाल दाता शनी’, ‘डायन’ आणि ‘नक्षलबारी’ या शोमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पवनदीपच्या बहिणीने केले अरुणितासोबतचे सुंदर फोटो शेअर; चाहते म्हणाले, ‘वहिनीला घरी घेऊन जावा’

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

हे देखील वाचा