Saturday, March 14, 2026
Home बॉलीवूड प्रसिद्ध मल्याळम गीतकार अनिल पनाचूरन यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध मल्याळम गीतकार अनिल पनाचूरन यांचे दुःखद निधन

नवीन वर्षाची सुरुवात होऊन दोन दिवस होत नाही तोपर्यंत या वर्षातील पहिली वाईट बातमी आली. मल्याळम भाषेतील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार अनिल पनाचूरन यांचे ३ जानेवारी रविवार रोजी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार पनाचूरन हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे त्यांना कोल्लम जिल्ह्यतील दवाखान्यात उपचारासाठी भरती केले होते. परंतु त्यांची तब्येत सतत खराब होत असल्याने त्यांना तिरुवनंतपूरम येते नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचे संध्याकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेस नेता रमेश चेन्नितला यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केले आहे.

अनिल पनाचूरन यांचे खरे नावं पी यू अनिल कुमार होते. त्यांनी त्यांचे बालपण मुंबई मध्ये व्यतीत केले. त्यांनी TKM कॉलेज, Nangiyarkulangara, लॉ अकॅडमी, तिरुवनंतपुरम, आणि काकतीय विश्वविद्यालय, वारंगल येथून त्यांचे शिक्षण आणि मास्टर्स डिग्री पूर्ण केली. गीतकार होण्याआधी अनिल वकील होते. त्यानंतर त्यांनी गाणे लिहायला सुरुवात केली.

अनिल यांनी अनेक चित्रपटांसाठी अर्थपूर्ण गाणी लिहिली. अनिल यांच्या अनेक कविता केरळच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या. २०१७ साली त्यांचे एक गाणे ‘Jimikki Kammal’ खूपच जास्त लोकप्रिय झाले. अनिल पनाचूरन यांना दैनिक बोंबाबोब कडूनही भावपूर्ण श्रद्धांजली

 

हे देखील वाचा