Wednesday, March 11, 2026
Home कॅलेंडर चित्रपटांपासून दूर गेलेली मल्लिका पुन्हा एकदा आली चर्चेत! नव्या वर्षात केलेलं बोल्ड फोटोशूट झालं व्हायरल…

चित्रपटांपासून दूर गेलेली मल्लिका पुन्हा एकदा आली चर्चेत! नव्या वर्षात केलेलं बोल्ड फोटोशूट झालं व्हायरल…

काही बॉलिवूड कलाकार हे सध्या चित्रपटांमध्ये फारसे दिसत नसले तरीदेखील ते चर्चेत कायम असतात. त्यांना चर्चेत ठेवणारं माध्यम आहे सोशल मीडिया! हे कलाकार सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे अनेक हॉट फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतात. त्यांचे चाहते देखील त्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असतात. आपल्या आवडत्या कलाकारांचे फोटोज किंवा व्हिडिओज व्हायरल करतात. अशीच एक बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सध्या चित्रपटांपासून दूर आहे पण चर्चेत मात्र कायम आहे ती म्हणजे मल्लिका शेरावत! मल्लिका सध्या केरळमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. तिचे लेटेस्ट काहो फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. चला तर मग पाहुयात मल्लिकाचे हे व्हायरल फोटोज…

हिसारच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या अभिनेत्री मल्लिका शेरावतने बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास केला. मल्लिका सध्या केरळमध्ये नवीन वर्ष साजरं करीत आहे. तिथून ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सतत तिचे बोल्ड फोटोज शेअर करतेय. यातील तिचे काही हॉट फोटोज आपल्यासाठी!

मल्लिकाने घरच्यांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला मिळालेलं यश पाहून कालांतराने तिच्या घरच्यांनीही तिला पाठींबा द्यायला सुरुवात केली. २००२ मध्ये तिने जीना सिर्फ मेरे लिये या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. परंतु २००३ मध्ये आलेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होत. या चित्रपटात मल्लिकाने १७ किसिंग सीन्स देऊन बॉलिवूडमध्ये एक वेगळीच चर्चा तयार केली होती. सर्वांना तिने चकित करून टाकलं होतं. मल्लिकाने हिंदीबरोबरच इंग्रजी आणि चीनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मल्लिकाचे आणखी काही सुंदर फोटोज आपल्यासाठी…

मल्लिका चित्रपटात दिसण्यापूर्वी हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. ‘ख्वाहिश’ चित्रपटाने चर्चेत आलेल्या मल्लिकाला ‘मर्डर’ चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. ‘मर्डर’ चित्रपटात इमरान हाश्मी मल्लिकासोबत मुख्य भूमिकेत होता. मल्लिकाने ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, आपका सूरूर’ आणि ‘डबल धमाल’ यासारख्या हिट कॉमेडी चित्रपटांमध्येही काम केले आहे. यासोबत तिने डरना जरुरी है, वेलकम, बचके रहना रे बाबा, या आणखीन काही बॉलिवूड पटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने जॅकी चॅन सोबत द मिथ या चायनीज सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे तिने पॉलिटिक्स ऑफ लव्ह या हॉलिवूडपटात देखील काम केलं आहे. मल्लिकाचे हे आणखीन काही लेटेस्ट फोटोज आपल्यासाठी…

मल्लिकाचे खरं नाव रीमा लांबा आहे. चित्रपटांमध्ये काम करू लागल्यावर तिने स्वतःचं नाव बदलून मल्लिका शेरावत केलं. २०१५ मध्ये आलेला डर्टी पॉलिटिक्स हा तिचा शेवटचा चित्रपट आहे. यानंतर ती चित्रपटांमध्ये फारशी झळकली नाही. परंतु तिच्या चाहत्यांना आणखी फार वाट पाहावी लागणार नाही कारण यावर्षी तिचे एक दोन नाही तर तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. झीनत, पोलीस टायगर आणि कॉन्ट्रॅक्ट या सिनेमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर तिच्या बोल्ड अदा प्रेक्षकांना दाखवण्यास सज्ज झाली आहे.

हे देखील वाचा