Monday, June 1, 2026
Home बॉलीवूड ऋतिक रोशनच्या आईचा जिममध्ये भन्नाट डान्स, आईचे कौतुक करताना अभिनेता म्हणाला…

ऋतिक रोशनच्या आईचा जिममध्ये भन्नाट डान्स, आईचे कौतुक करताना अभिनेता म्हणाला…

बॉलिवूडमधील हँडसम हंक आणि ग्रीक गॉड म्हणून ओळख मिळवलेला ऋतिक रोशनचे जगभरात करोडो फॅन्स आहेत. ऋतिक त्याच्या दमदार अभिनयासोबत त्याच्या जबरदस्त डान्ससाठी देखील ओळखला जातो. भल्या भल्यांना जमणार नाही अशा डान्स स्टेप्स ऋतिक अगदीच लीलया करतो. मात्र आपण कधीच त्याच्या कुटुंबापैकी कोणालाच आजवर डान्स करताना पाहिले नाही. मात्र आता ही खंत संपणार आहे. कारण नुकताच ऋतिकच्या आईचा एक दमदार डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पिंकी रोशन यांचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. चाहत्यांची याला चांगलीच पसंती मिळत आहे. ऋतिकच्या चाहत्यांनी देखील त्याच्या आईच्या डान्सच्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

पिंकी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका जिममधला असून, त्यांनी या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे टीशर्ट आणि पांढऱ्या,काळ्या रंगाची डिझाइन असलेली पॅन्ट घातली आहे. केस मोकळे असून फक्त एक हेअरबँड लावला आहे. त्या जिममध्ये वर्कआउट करत डान्स करत आहेत.

तसेच वर्कआउट करत असताना माघे ‘दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए’ हे गाणं सुरु आहे. त्या आपलं वर्कआउट एन्जॉय करत डान्सचा आनंद घेत आहेत. अनेक तरुण मंडळी जिममध्ये वर्कआउट करायला कंटाळा करतात. परंतु त्यांनी पिंकी रोशन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. त्या या वयातही उत्तम व्यायाम करतात आणि स्वतःला फिट ठेवतात.

आपल्या आईचा हा सुपर डान्स व्हिडीओ ऋतिकला देखील फार आवडला. त्याने यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “ही सर्वात श्रेष्ठ प्रकारची एक्सरसाइज आहे आणि हा व्हिडीओ गाणं विसरून जायला भाग पडत आहे.” हा संपूर्ण व्हिडीओ ४ मिनिट ७ सेकंदांचा आहे.

ऋतिकच्या अभिनयाच्या कारकिर्दी विषयी बोलायचे झाले, तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘क्रिश’ या चित्रपटाचा चौथा भाग धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘क्रिश ४’ चा टीजर रिलीज झाला. या चित्रपटातून पुन्हा एकदा जादू आणि ऋतिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

हे देखील वाचा