गेली अनेक दशके बॉलिवूड प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चित्रपटांमुळे बॉलिवूड जसे प्रसिद्ध आहे तसेच अश्लिल चित्रपट आणि ड्रग्समूळे बदनाम देखील आहे. बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर, सामाजिक संदेश देणारे, महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारे असे अनेक चित्रपट आपण पाहतो. परंतु त्याच बॉलिवूडमध्ये अश्लिलतेचे घाणेरडे प्रकार घडतात हे सत्य आहे. अशात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी १९ जुलै रोजी अटक केली. त्याच्या या प्रकरणाचा त्रास शिल्पाला देखील भोगावा लागला. अशात अश्लील चित्रपटांसंदर्भात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका मॉडेलने राज कुंद्रा सारख्याच एका प्रोडक्शन कंपनीमुळे ती पीडित असल्याचा गंभीर खुलासा केला आहे.
परी पासवान नावाच्या एका मॉडेलने तिला फसवून तिचा अश्लील व्हिडीओ काढल्याचा आरोप केला आहे. परी ‘मिस इंडिया यूनिवर्स २०१९’ची मानकरी आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “मी एक मॉडेल आहे. काम शोधण्यासाठी मी एका प्रोडक्शन कंपनीमध्ये पोहचले. तिथे गेल्यानंतर माझ्याबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला. तेथील लोकांनी मला एक पेय देऊन त्यामध्ये नशेचे औषध टाकले. मी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांनी माझा अश्लिल व्हिडीओ काढला. या घटनेची माहिती मला कळताच मी याबाबत मुंबई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.”
तिचे लग्न कतरास येथील रहिवासी नीरज पासवानसह झाले. त्यानंतर तिने आपल्या पतीवर कौटुंबिक अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणी कतरास येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो अटकेत आहे.
नीरज पासवानला अटक झाल्यानंतर त्याचा भाऊ चंदन आणि त्याची आई यांनी परीवर काही आरोप केले. चंदन तिच्यावर आरोप करत म्हणाला की, “परी एक ढोंगी बाई आहे. तिने राज कुंद्राच्या अश्लिल चित्रपटात काम केले आहे. तिचे या आधी दोन विवाह झाले आहेत आणि तिला एक १२ वर्षाची मुलगी देखील आहे. परी अशीच काही मुलांना स्वतःच्या जाळ्यात ओढते आणि नंतर उध्वस्त करते. आपल्या स्त्री असल्याचा ती घाणेरडा फायदा घेत आहे.”
तिने लिलोरी मंदिराजवळ असलेल्या लक्ष्मण धर्मशाळेमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. तिने यामध्ये सांगितले की, “माझ्या सासरच्यांनी अश्लिल व्हिडीओ बाबत केलेले विधान खरे आहे. परंतु माझ्याकडून जबरदस्ती ते काम करून घेतले होते. त्याची तक्रार देखील मी मुंबई पोलीस ठाण्यामध्ये केली आहे. परंतु सासरच्या मंडळींनी माझ्यावर केलेले आरोप साफ खोटे आहेत.” यानंतर तिने पुढे तिच्या लग्नाविषयी खुलासा केला. परी म्हणाली की, “नीरज लग्नाच्या दोन वर्ष आधी पासून मला ओळखत होतो. तो अनेक वेळा माझ्या घरी देखील आला होता. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ आजही माझ्याकडे आहेत. आमचे लग्न हिंदू पद्धतीने कतरास येथील मंदिरात आणि त्यानंतर गुमला येथील जगरनाथ मंदिरामध्ये झाले.”
परी पुढे म्हणाली की, ” लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. काही दिवस चांगले गेले. नंतर माझा पती नीरज आणि सासरची बाकीची मंडळी मला त्रास देत हुंडा मागू लागले. त्यांनी माझ्याकडे तब्बल ५ लाख रुपये आणि एक गाडी माघितली होती. मी त्यांना यासाठी नकार दिल्यानंतर १६ जुलै रोजी त्यांनी मला मारहाण केली. त्यामुळे मी त्यांच्या विरोधामध्ये कतरास पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.” पुढे तिने एका प्रोडक्शन कंपनीमध्ये झालेला प्रकार देखील सांगितला. त्यामुळे बॉलिवूडमध्ये अजून किती ठिकाणी अश्लिल चित्रपट बनवण्याचे काम सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट
-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’
-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण










