Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी

चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांची प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने साजरी करतात. आयुष्यातील प्रत्येक घटना ते खास बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते लग्न असो, त्यांचे वाढदिवस असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो ते प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील एक गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.

अभिजित खांडकेकरने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याची पत्नी सुखदासोबत एक फोटो शेअर करून त्यांच्या आयुष्यातील ही गोड बातमी दिली आहे. अभिजित आणि सुखदा यांनी त्यांचे नवीन घर खरेदी केले आहे, याची माहिती त्यांनी दिली आहे. अभिजीतने त्याच्या पत्नीसोबत एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिजितने लाल रंगाचा कुर्ता घातला असून, सुखदाने लाल रंगाची एक सुंदर साडी नेसली आहे. तिने अभिजितच्या हातावर डोके टेकवून डोळे मिटून झोपलेली दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही अत्यंत सुंदर, अकर्षक दिसत असून, दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या अंगठ्याला शाई लागलेली दिसत आहे.(Marathi couple Abhijit khandkekar and sukhada khandkekar share a good news on social media)

हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “आणि आम्ही हो म्हटलो. आमच्या नव्या पत्त्याला, आमच्या नव्या भिंतींना आनंद मिळू देत, प्रत्येक खोलीत हास्य असू देत. प्रत्येक खिडकी मोठ्या शक्यतेसाठी खुली असू देत.” या फोटोवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्यांच्या या फोटोवर सुयश टिळक, शिवानी बावकर, क्षितिज जोग, नंदिता पाटकर, प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी कमेंट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

अभिजितने २०१० साली झी मराठी या वहिनीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ का मालिकेत मृणाल दुसानिससोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. त्यांची प्रेमकहाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले. या मालिकेने जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेत त्याने अनिता दाते आणि रसिका सुनीलसोबत मुख्य पात्र निभावले होते. या मालिकेत एक लव्ह ट्राऍंगल दाखवला होता.

त्याने २०१३ साली अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिच्याशी विवाह केला. सुखदा देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अहिल्या’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.

अभिजितने ‘जय महाराष्ट्र’, ‘भय’, ‘मी पण सचिन’, ‘ढोल ताशे’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘ध्यानी मनी’, ‘बाबा’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘क्रिमिनल्स : चाहूल गुन्हेगाराची’ या मालिकेत होस्ट म्हणून काम करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा