Saturday, March 7, 2026
Home बॉलीवूड सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने टाकली होती धाड; आता अधिकारी करतायेत त्याचेच कौतुक

सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने टाकली होती धाड; आता अधिकारी करतायेत त्याचेच कौतुक

कोरोना महामारीमध्ये अभिनेता सोनू सूद गरजूंच्या मदतीला देवासारखा धावून आला. त्याने केलेले महान कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे. अशात मागील आठवडा त्याच्यासाठी खूप त्रासदायक आणि चिंताजनक ठरला. त्याच्याकडे असलेल्या आर्थिक संपत्तीवरून त्याला आयकर विभागाने धारेवर धरलं आणि त्याच्या घरी धाड टाकली. त्याच्यावर एफसीआरएच्या उल्लंघनाचे आरोप लावण्यात आले. परंतु त्याने या सर्व अडचणींना शांत डोक्याने तोंड दिले.

सध्या त्याने त्याला आलेल्या अनुभवाबद्दल एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, “इनकम टॅक्सला मी माझे सर्व कागदपत्र जमा केले आहेत. माझ्यावर जसा आरोप लावण्यात आला होता, तशी माझ्याकडे लखनऊ आणि जयपूरमध्ये एक इंच देखील जमीन नाही.” (Income tax officers came to raid Sonu Sood’s house, started praising the actor’s noble deeds)

पुढे अवैध पद्धतीने परदेशी धन घेतल्याच्या आरोपावर तो म्हणाला, “फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेगुलेशन ऍक्ट अंतर्गत कोणतीही कंपनी अथवा फाउंडेशन तीन वर्षांपासून नोंदणीमध्ये असेल, तरच पैसे घेऊ शकते. माझी संस्था रजिस्टर नाही, त्यामुळे मला पैसे मिळू शकत नाहीत. क्राउडफंडिगकडे पैसे आहेत. मी तर त्यासाठी मात्र निमित्त आहे. सर्व मदत ही क्राउडफंडिंगकडून सरळ दवाखाने आणि गरजूंच्या उपचारांसाठी तसेच शिक्षणासाठी वापरली जाते.”

एफसीआरएच्या उल्लंघनावरील आरोपावर तो म्हणाला, “हा आरोप खूप चुकीचा आहे. कारण पैसे माझ्या किंवा भारताच्या फाउंडेशनमध्ये आलेच नाहीत. आम्ही ज्या ज्या लोकांना मदत केली आहे, त्यांची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्या लोकांचे हॉस्पिटल, डॉक्टर एवढंच नाही, तर त्यांचे फोन नंबर आणि पॅन नंबर देखील मी अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत.”

तसेच अतिथी देवो भव: हे लक्षात ठेवत सोनूने आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचा चांगला पाहुणचार केल्याचे देखील सांगितले. तो म्हणाला की, “जेव्हा सकाळी सकाळी माझ्या घरी आईटी टीम आली तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांचे स्वागत केले. मी त्यांना म्हणालो तुम्ही लोकांनी आतापर्यंत खूप ठिकाणी धाड टाकलेली आहे. माझ्या घरून तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला एक छान अनुभव मिळाला असे वाटेल. मी त्यांना म्हणालो, तुम्ही आता ३ ते ४ दिवस माझे पाहुणे आहात त्यामुळे तुमची सेवा मी केलीच पाहिजे. त्यानंतर जाताना मी त्यांना त्यांचा अनुभव विचारला तेव्हा ते मला म्हणाले सर्वात बेस्ट आणि खास अनुभव होता. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. तसेच ते म्हणाले तुझ्या कामाविषयी आम्हाला माहित आहे. तू जे काही करत आहेस ते खरोखरच अद्भुत आहे.”

“पुढच्या ५० वर्षांत मी असेल नसेल मला माहित नाही, पण माझे काम लोकांना दिसले पाहिजे आणि त्यांना मदत झाली पाहिजे. माझे ध्येय खूप मोठे आहे.” असेही तो पुढे म्हणाला. त्याला हैदराबादमध्ये एक चैरिटेबल हॉस्पिटल खोलायचे आहे आणि त्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा