Sunday, May 24, 2026
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टीच्या मुलांचा योगा क्लास, व्हिडिओ शेअर करत लिहिले, “मला तुमचा गर्व आहे’

शिल्पा शेट्टीच्या मुलांचा योगा क्लास, व्हिडिओ शेअर करत लिहिले, “मला तुमचा गर्व आहे’

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी किती फिटनेस फ्रिक आहे हे तर सर्वानाच माहित आहे. ती योगाची जबरदस्त फॅन आहे आणि लोकांना फिट राहण्यासाठी देखील ती नेहमीच प्रेरणा देते. शिल्पा नेहमी तिच्या योगाचे व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करते. मात्र यावेळेस शिल्पाने तिचा योगा करत असल्याचा व्हिडिओ शेअर न करता तिच्या मुलांचा व्यायाम करत असल्याचाच व्हिडिओ पोस्ट केला आहे.

शिल्पा शेट्टीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पाची मुलगी समिशा आणि मुलगा वियान योगा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये वियान योगा करत आहे आणि त्याची लहान बहीण त्याची कॉपी करत आहे. शिल्पाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने लिहिले की, “मुलं ओल्या मातीसारखी असतात, निरोगी आयुष्यासाठी आपण त्यांना सुरुवातीपासूनच घडवले पाहिजे. ज्यामध्ये संतुलित आहाराची सवय लावणे, तंदुरुस्त राहणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मी देखील वियानसोबत तेच करण्याचा प्रयत्न केला. आता तेच वियान त्याच्या लहान बहिणीसोबत करत तिला योगा शिकवत आहे. मला तुझा अभिमान आहे. योगासह असे बॉंडिंग बघणे प्रेरणादायक आहे. जे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्याबरोबर हा आठवडा आपणा सर्वांसाठी चांगला जावो.” चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

शिल्पा शेट्टीने कन्यादिनानिमित्त तिच्या मुलीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला. व्हिडीओमध्ये समिशा शिल्पासोबत पूजा करताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ गणपती पूजेचा आहे. तिचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा