Tuesday, August 5, 2025
Home मराठी ‘माझ्या दिलोचो पावशेर किलोचो’, सोनाली आणि हेमांगीने सोबतच धरला ठेका आणि केला धमाकेदार डान्स

‘माझ्या दिलोचो पावशेर किलोचो’, सोनाली आणि हेमांगीने सोबतच धरला ठेका आणि केला धमाकेदार डान्स

 

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांची माहिती तर देतच असतात. यासोबत त्यांचे कलागुण देखील ते सोशल मीडियावर सादर करत असतात. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ते शेअर करतात. अशातच चित्रपटसृष्टीतील दोन अभिनेत्रींनी त्यांचा एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स शेअर केला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी हिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासोबत एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघीही ‘माझे दिलोचो पावशेर किलोचो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. व्हिडिओमध्ये सोनाली साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. तर हेमांगी कवीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसत आहे. दोघीही या व्हिडिओमध्ये खूप सुंदर हावभाव करताना दिसत आहे.  ( Sonalee kulkarni and hemangi kavi’s dance video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून हेमांगी कवीने लिहिले आहे की, “उसकी साडी मेरे साडी से सफेद है क्यूकी मेरी साडी गुलाबी है ना बाबा.” तिच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. परंतु तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आणि मुख्य म्हणजे हेमांगीने देखील त्याला रिप्लाय दिला आहे. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “हिला अनफॉलो केलंय आणि आता पुन्हा पाहावं लागतंय” या कमेंटवर हेमांगीने रिप्लाय दिला आहे की, “अरे ब्लॉक करून ना! शोधलं तरीही दिसणार नाही?”

सोनाली आणि हेमांगी या दोघीही मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आभिनेत्री आहेत. त्या दोघींनी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. दोघींच्या कामाचे देखील खूप कौतुक होत असते. सोशल मीडियावरील त्यांचा हा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.\

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा