Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड “देखो.. मगर प्यार से” म्हणणाऱ्या ईशा गुप्ताने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो

“देखो.. मगर प्यार से” म्हणणाऱ्या ईशा गुप्ताने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो

कलाकार आणि त्यांचे सोशल मीडिया प्रेम हे तर सर्वश्रुत आहे. कलाकार सोशल मीडियावर सक्रिय राहून फॅन्ससोबत जोडले जातात. कलाकारांना सोशल मीडियावर फॅन्सकडून भरपूर प्रेम मिळते. सध्या तर सोशल मीडिया म्हणजे कलाकारांसाठी त्यांचे प्रमोशनचे उत्तम माध्यम बनत चालले आहे. सोशल मीडियावर कलाकरांना त्यांचे प्रमोशन करणे काळानुसार खूप गरजेचे झाले आहे. सोशल मीडियावर कलाकरांना मिळणारी लोकप्रियता त्यांचे फॅन फॉलोविंग हे त्यांना सिनेमे मिळवून देण्यात खूप मोठी भूमिका बजावतात. सोशल मीडियावर बरेच अपयशी कलाकार देखील सुपरस्टार असतात.

या सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे, ईशा गुप्ता. जन्नत २ फेम ईशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. ईशा गुप्ता तिच्या सोशल मीडियावर बहुतकरून तिचे बोल्ड फोटोस पोस्ट करताना दिसते. अतिशय फिट असणारी ईशा नेहमीच तिचे एकापेक्षा एक फोटो पोस्ट करते. नुकताच तिने तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ब्लू जीन्स आणि ऑफ व्हाईट स्लिव्हलेस टॉपमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचे हिल सँडल्स आणि हातात घड्याळ घातले आहे. तिच्या या लुकला तिचे मोकळे केस पूर्ण करत आहे.

ईशाचा हा फोटो एखाद्या मोठ्या महालात किंवा मोठ्या घरात काढलेला दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “देखो.. मगर प्यार से”. तिच्या या फोटोवर तिचे फॅन्स आणि कलाकार देखील कमेंट्स करत आहे. ईशा सतत तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पहिले तर तिचे भरपूर बोल्ड फोटो पाहायला मिळतील.

ईशा मागच्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. तिला तिच्या रंगावरून लहानपणी कसे चिडवले जायचे याबद्दल तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. लहान असताना तिला तिचे मित्र, नातेवाईक, शेजारचे ‘काली माँ’ नावाने चिडवायचे. मात्र तिने कधीच हे चिडवणे मनावर घेतले नाही.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा