Monday, July 8, 2024

मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रतीक करणार ‘बिग बॉस १५’मध्ये धमाल; वयाने १४ वर्षे मोठ्या अभिनेत्रीला करायचा डेट

‘बिग बॉस ओटिटी’ नंतर आता ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वाची रसिक प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. या शोमध्ये येणाऱ्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. अशात आता प्रतीक सहजपाल देखील या शोमध्ये धमाल करताना दिसणार आहे.

मध्यमवर्गीय आहे कुटुंब
प्रतिक एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याने दिल्लीमध्ये त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमिटीमधून त्याने पुढील शिक्षण घेतले. त्याने वकिलीची देखील पदवी मिळवली आहे. त्याची आई गृहिणी असून बाबा एका खासगी ऑफिसचे कर्मचारी आहेत. त्याची बहीण प्रेरणा सहजपाल एक मेकअप आर्टिस्ट आहे.

बॉडी बिल्डिंगचा आहे शौकीन
प्रतिकला अभिनयासह बॉडी बिल्डिंगची देखील लहानपणापासूनच आवड होती. त्याने साल २०१८ मध्ये एक बॉडी बिल्डिंगची एक स्पर्धा देखील जिंकली. मुळातच तो रागीट स्वभावाचा आहे. बिग बॉसच्या घरामध्ये देखील त्याने खूप वाद केला होता. त्यामुळे सर्व जण त्याला ‘अँग्री यंग मॅन’चा किताब देखील मिळाला होता.

वयाने १४ वर्षे मोठ्या अभिनेत्रीला करत होता डेट
अभिनेत्याने ‘बिग बॉस १४’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पवित्रा पुनियाला डेट केले आहे. बिग बॉसच्या घरामध्ये येण्याआधी त्याने त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यावेळी पवित्रा खूप खतरनाक होती. तिने घरामध्ये एकदा भांडण झाल्यावर मोठी तोडफोड केली होती. हे देखील त्याने सांगितले होते.

‘बिग बॉस १५’ मध्ये येणार
‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये प्रतिकने आल्याबरोबर धुमाकूळ घातला होता. त्याचे शमिता आणि दिव्याबरोबर जंगी भांडण झाले होते. शेवटपर्यंत तो घरातील सगळ्या सदस्यांबरोबर गोड होता, पण दिव्या आणि राकेशबरोबर त्याचे थोडे वाकडेच होते. आता ‘बिग बॉस १५’ मध्ये तो येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

पोहोचला होता टॉप ५ मध्ये
प्रतिक ‘बिग बॉस ओटीटी’च्या टॉप ५ मध्ये होता. परंतु नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या घरात जो ट्विस्ट असतो तो झाला. त्यानंतर प्रतिकला ‘बिग बॉस ओटीटी’मधून थेट ‘बिग बॉस १५’ मध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच त्याने देखील हे स्वीकारले. आता पुढे काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

हे देखील वाचा