Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एनसीबीने केली अटक, गंभीर गुन्ह्यात अडकण्याची आहे शक्यता

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एनसीबीने केली अटक, गंभीर गुन्ह्यात अडकण्याची आहे शक्यता

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अमली पदार्थांप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. अशात या सर्वांमध्ये आता बॉलिवूडचा बादशाह किंग खानचा मुलगा आर्यन खानचे नाव देखील समोर आले आहे.

मुंबईच्या किनारपट्टीवर २ ऑक्टोबर रोजी एका क्रूज शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक मोठ मोठ्या हस्ती सहभागी होत्या. अशात येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना येथे काही अमली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एका वृत्तपत्राशी संभाषण करत असताना एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्यनची चौकशी सुरू आहे.

या सर्व प्रकारावर एका विश्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनला चौकशीसाठी नेण्यात आले होते. पण त्याच्याकडे कोणतेही अमली पदार्थ मिळाले नाहीत. तसेच यामध्ये बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांपैकी आणखी एका अभिनेत्याचा मुलगा असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचे नाव अद्याप समोर आले नाही.

शनिवारी (२ ऑक्टोबर) रात्री एएनआयने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये असे लिहिले होते की, “महाराष्ट्र: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील क्रूझवरील आयोजित एका पार्टीवर छापेमारी केली. या दरम्यान किमान १० जणांना ताब्यात घेतले आहे. याचा संपूर्ण तपशील लवकरच सादर केला जाईल.”

आर्यनची सध्या कसून चौकशी सुरू आहे. तसेच शाहरुख खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय मोठ्या चिंतेत असल्याचे दिसत आहे. शाहरुखच्या मुलाला एनसीबीने ताब्यात घेतल्याने त्याचे चाहते देखील चिंतेत आहेत. तसेच या सर्व प्रकरणाचा किंग खानच्या करिअरवर देखील परिणाम होणार का? अशी भीती त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा