Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड ईशा गुप्ताने बोल्ड फोटो शेअर करताच नेटकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, ‘कपडे नव्हते का?’

ईशा गुप्ताने बोल्ड फोटो शेअर करताच नेटकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, ‘कपडे नव्हते का?’

अभिनेत्री ईशा गुप्ताने सिनेसृष्टीमध्ये तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी ती नेहमी प्रमाणे आता ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. अभिनेत्री कायमच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधते. अशात तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

ईशा काही दिवसांपूर्वीच जयपूरला गेली आहे. इथे ती तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ती ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे. तिथून तिने बाल्कनीमध्ये तिचे काही फोटो शूट केले आहेत. यामध्ये ती खूप हॉट आणि मादक दिसत आहे. टू पीस बिकिनीमध्ये ईशा बाल्कनीमध्ये उभी राहून वेगवेगळ्या पोज देत उभी आहे. तसेच बाल्कनीमधून समोर असलेला हिरवागार निसर्ग देखील दिसत आहे. तिचा हा हटके अंदाज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

ईशाचे हे शेअर केलेले बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तिच्या या मादक अदांनी इंटरनेटवर आग लावली आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच काहींनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार देखील केला आहे. बोल्ड फोटोंमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केले जात आहे. एकाने तिला कमेंटमध्ये असे लिहिले की, “तुझ्याकडे कपडे नाहीयेत का?” पहिल्यांदा नाही की ईशाने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले, याआधी देखील तिने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. बऱ्याचदा तिने ट्रोलिंगचाही सामना केला आहे. त्यामुळे ती आता या ट्रोलिंगकडे साफ दुर्लक्ष करते आणि तिच्या मर्जीने राहते.

ईशाच्या मनामध्ये बॉलिवूडमधील काही गोष्टींविषयी खूप राग आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “मी सावळ्या रंगाची आहे. त्यामुळे शूटिंवेळी अनेकदा माझ्या पूर्ण अंगावर रंग लावला जायचा. आपल्या सिनेसृष्टीमध्ये सावळ्या मुलींकडे बोल्ड अथवा नकारात्मक नजरेने पाहिले जाते.”

ईशाने ‘जन्नत २’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘राज ३’, ‘चक्रव्यूह’, ‘गोरी तेरे प्यार मे’, ‘कमांडो २’, ‘पलटण’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा