बॉलिवूड कलाकारांचे जुने फोटो सतत इंटरनेटवर व्हायरल होत असतात. चाहते कलाकारांचे जुने फोटो आणि त्यांच्याशी संबंधित कथा जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक लहान मुलगी तिच्या भावासोबत अंथरुणावर झोपलेली दिसते आणि दोन्ही भावंडे हसत आहेत.
ओळखा ‘ही’ अभिनेत्री कोण आहे?
आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली ही लहान मुलगी फोटोत हसताना दिसत आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, ही गोंडस मुलगी कोण आहे? कदाचित सर्वोत्कृष्ट चाहते देखील अंदाज लावू शकणार नाहीत की, हे कोणत्या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या तिन्ही खानांसोबत काम केले आहे.

तीनही खानांसोबत केले काम
या अभिनेत्रीने सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत काम केले आहे. जर तुम्हाला अजूनही याचा अंदाज येत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगू की, ती दुसरी, तिसरी कोणी नाही, तर अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीच्या बालपणीच्या या फोटोने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
‘या’ चित्रपटांमध्ये केले काम
सोशल मीडियावरील एका अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. जो आता अनुष्का शर्माच्या सर्व फॅन पेजवर शेअर केला जात आहे. सलमान खानसोबत ‘सुलतान’ चित्रपटात, शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ मध्ये आणि आमिर खानसोबत ‘पीके’मध्ये तिने काम केले आहे.
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. अनुष्का पूर्वी तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये व्यस्त असली, तरी तिची निर्मिती वेबसीरिज ‘पाताल लोक’ ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर आणि नेटफ्लिक्सवर ‘बुलबुल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मस्तच! सबाने शेअर केला शर्मिला अन् मन्सूर अली यांच्या साखरपुड्याचा फोटो, चाहते म्हणाले…
-काय सांगता! ‘द फ्लॅश’मध्ये पाहायला मिळणार दोन व्हर्जन; इझरा मिलरचा ‘डीसी फँडम’मध्ये खुलासा
-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा










