‘स्लमडॉग मिलिअनेअर’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटो सोमवारी (१८ ऑक्टोबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या चित्रपटामधून तिने प्रेक्षकांची खूप वाहवा मिळवली. तिचा जन्म १८ ऑक्टोबर १९८४ रोजी मुंबईमध्ये एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे वडील बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक होते, तर आई मुंबईच्या गोरेगाव येथील सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्या होत्या. तिचे प्राथमिक शिक्षण मालाड येथील सेंट जोसेफ शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर तिने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पुढील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून तिला अभिनयाची खूप आवड होती. सुरुवातीच्या काळात तिने मॉडलिंगला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक जाहिरातींमध्ये झळकू लागली. फ्रिडाने आज तिच्या दमदार अभिनयाने यशाचे शिखर गाठत खूप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिली.
फ्रिडा तिच्या पहिल्या चित्रपटातील अर्थात ‘स्लमडॉग मिलिनियर’मधील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता देव पटेलच्या प्रेमात पडली होती. पुढे हे दोघे जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी तिचे वय ३० वर्षे होते, तर देव तिच्या पेक्षा ६ वर्षे लहान म्हणजेच २४ वर्षांचा होता. या दोघांच्या प्रेमाची सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरू असायची. दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की, अनेकांना वाटत होते हे दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील. परंतु तसे काही झाले नाही. त्यांचे हे प्रेम काही काळच टिकू शकले. पुढे २०१४ साली त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. सध्या जरी त्यांच्यात प्रेमाचे नाते नसले, तरी त्यांच्यातील मैत्री आजही पूर्वीसारखीच आहे. त्यानंतर फ्रिडाचे नाव रॉनी बकार्डीबरोबर जोडले गेले. मात्र रॉनी बरोबर देखील फ्रिडाचे काही वर्षांमध्ये ब्रेकअप झाले. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. परंतु अचानक त्यांच्यातील वाद वाढू लागले आणि दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
सध्या फ्रिडा फोटोग्राफर कोरी ट्रेनच्या प्रेमात असून, लवकरच ती त्याच्या बाळाची आई होणार आहे. कोरी फ्रिडावर खूप प्रेम करतो. अशात या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लवकरच फ्रिडा आणि कोरी एका बाळाला जन्म देणार आहेत. मात्र या दोघांचे अद्याप लग्न झालेले नाही. पण दोघांनी त्यांचा साखरपुडा उरकून घेतला आहे. त्यांचे चाहते आता त्यांच्या बाळाची आणि दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
फ्रिडा आजवर ‘ब्लॅक गोल्ड’, ‘नाईट ऑफ कप्स’, ‘डेजर्ट डान्सर’, ‘लव सोनिया’, ‘मोगली’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. साल २०१३ मध्ये तिचे ‘गोरिला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला देखील चाहत्यांची खूप पसंती मिळाली. तसेच तिने ‘फुल सर्कल’, ‘द पाथ’ अशा काही मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे. तसेच तिच्या पहिल्या चित्रपटातील अभिनयासाठी तिला दोन पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी










