‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नुकतीच सुरेखा कुडची यांची एक्झिट झाली आहे. घरातून जाताना महेश मांजरेकर यांनी त्यांना एक विशेष अधिकार दिला होता. मांजरेकरांनी त्यांना घरात या आठवड्याचा कॅप्टन निवडण्याची संधी दिली. त्यावेळी त्यांनी तृप्ती देसाई यांची कॅप्टन म्हणून निवड केली. त्यामुळे आता या आठवड्यातील घरातील कारभार त्याच सांभाळणार आहेत. अशातच तृप्ती देसाई आणि आणि सोनाली पाटील यांच्यामध्ये वाद झाले आहेत.
कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिग बॉस मराठीचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सोनाली आणि तृप्ती यांच्यामध्ये शाब्दिक भांडण झालेले दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून समजत आहे की, कामावरून त्या दोघींमध्ये वाद झाले आहेत.
या प्रोमोमध्ये सोनाली म्हणते की, “मी तुमच्याशी वाद घालत नाहीये. मला जिथे गोष्टी पटत नाहीयेत, तिथे मला बोलणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाहीये. छोटीच गोष्ट आहे. छोट्याच गोष्टीला का इतकं मोठं केलं जात आहे? हे तिथे पण तुम्ही बोलू शकता ना? तुम्ही तिथे पण जाऊन सांगा ना. तुमच्याशी वाद घालायची माझी अजिबात इच्छा नाहीये. माझा आवाज चढतो आहे, तुम्हाला असं वाटेल की, मी तुमच्याशी भांडायला लागले आहे. प्लीझ जिथे मला खटकत आहे, तिथे मला बोलू द्या. प्लीझ मला बोलू द्या. तुम्ही मला बोलूच देत नाहीये. सकाळची माझी ड्यूटी नाही, मी करणार नाही. फेकून द्या. माझी बाजू आहे ना, तुम्ही प्रत्येकवेळा बोलायलाच हवं का ?” (bigg boss marati 3 : quarrel between sonali patil and trupti desai)
यानंतर तृप्ती म्हणाल्या, “वाद नाहीये हा, छोटी गोष्ट आहे. दोन्ही बाजूने ताणल गेलं, तर ते वाढणारच नाही का सोनाली. वाद नाही सामंजस्याची भूमिका घ्या. भांडायचा काय प्रश्न आहे यात. भात तुमच्याकडून कच्चा राहिला ना? फेकून द्या म्हणजे? हे चुकीचं आहे.”
विनाकारण बडबड चालू आहे, पण नेमकं त्यांच्या या वादाचं कारण काय हे आपल्याला येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला मंगळवारी (१९ ऑक्टोबर) कलर्स मराठीवर रात्री ९ : ३० वाजता पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक










