बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करण्याची एकही संधी ती सोडत नाही. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे, कधी तिच्या स्टाईलमुळे तर कधी तिच्या डान्समुळे ती नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनत असते. अशातच मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळे हावभाव करताना दिसत आहे.
तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते सातत्याने या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओमध्ये मलायकाने केशरी रंगाचा स्ट्रेपी ड्रेस घातला आहे. तसेच तिच्या मेकअपसोबत तिने न्यूड कलरची लिपस्टिक लावली आहे. तसेच ती कॅमेराकडे बघून डोळा मारत हावभाव देताना दिसत आहे. (Actress Malaika Arora share her video on social media)
तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचे जेवढे प्रेम मिळत आहे तेवढ्याच प्रमाणात काहीजण तिला ट्रोल करत आहेत. परंतु या ट्रोल्सवर अभिनेत्रीचे चाहते भारी पडत आहे. ते त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत.
यासोबतच मलायकाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रियॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता कपूर आणि टेरेंस लुईस सोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते तिघेही इंस्टाग्रामवर चाललेला ट्रेंड फॉलो करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर देखील चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर मलायकाचे १३ मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. तिच्या फिटनेसमुळे आणि सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनत असते.
यासोबत मलायका तिचे अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनमुळे देखील चर्चेत असते. त्या दोघांचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे ते नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-घाईघाईत पँट घालायला विसरली मलायका अरोरा, सोशल मीडियावर सांगितला किस्सा
-बाबो! आयटम साँगसाठी मलायका घेते १.७५ कोटी रुपये; संपत्तीचा आकडा वाचून फिरतील तुमचेही डोळे










