Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड समुद्राच्या लाटांसोबत खेळताना दिसली दिशा पटानी, अदा पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

समुद्राच्या लाटांसोबत खेळताना दिसली दिशा पटानी, अदा पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक खूप चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अत्यंत मजेशीर अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशाचा क्यूट अंदाज पाहून तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडाल. तिच्या चाहत्यांना तिच्याशी जोडून ठेवण्याची एकही संधी दिशा घालवत नाही. तिचे चाहते देखील तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात. ती देखील कधीच तिच्या चाहत्यांना नाराज करत नाही.

दिशाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दिशाने पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच एक छोटी बॅग घेतलेली दिसत आहेत. ती समुद्राच्या पाण्यातून चालत आहे. समुद्राच्या पाण्यात चालताना ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. (Bollywood actress disha patani glamorous look creating buzz on social media)

तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला‌‌ आतापर्यंत चार लाखापेक्षाही जास्त लाइक्स आले आहेत. तसेच दोन हजारापेक्षाही जास्त कमेंट्स आल्या आहेत. अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तिचे चाहते सातत्याने व्हिडिओ वर प्रतिक्रिया देत आहेत.

दिशाने २०१५ साली तेलुगू ‘लोफर’ या चित्रपटात तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनतर तिने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्या सोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा होता. यानंतर तिने ‘बाघी २’, ‘मलंग’, ‘भारत’ आणि ‘राधे योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात काम केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी ती टायगर श्रॉफसोबत असलेल्या रिलेशनमुळे खूप चर्चेत होती. परंतु त्यांनी ते दोघे केवळ मित्र आहेत असे सगळ्यांना सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा