Thursday, April 24, 2025
Home अन्य श्रद्धा आर्याला उचलून घेऊन मंडपात पोहोचला पती राहुल, वधू-वरावर खिळल्या सर्वांच्याच नजरा

श्रद्धा आर्याला उचलून घेऊन मंडपात पोहोचला पती राहुल, वधू-वरावर खिळल्या सर्वांच्याच नजरा

टेलिव्हिजनवरील मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘श्रद्धा आर्या’ विवाहबंधनात अडकली आहे. मंगळवारी (१६ नोव्हेंबर) तिने तिचा जीवनसाथी राहुल शर्मासोबत सात फेरे घेतले. श्रद्धाच्या लग्नानंतर आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर आलेली हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेले लग्नाचे फोटो पाहून चाहतेही खूप खुश दिसत आहेत. त्याचबरोबर या खास दिवशी श्रद्धा खूप आनंदी दिसत होती. तिच्या प्रत्येक फोटोत तिच्या चेहऱ्याची चमक पाहण्यासारखी होती. यादरम्यान श्रद्धा आणि राहुल यांच्यात छान बॉन्डिंगही पाहायला मिळाले. त्याचबरोबर काही फोटोंमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहत होते. तर कधी एकमेकांमध्ये हरवलेले दिसत होते.

समोर आलेल्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये लग्नादरम्यान, श्रद्धा जेव्हा हार घालण्यासाठी जाते तेव्हा ती तिचा नवरा राहुलला सर्वांसमोर म्हणते की, “मला घेऊन ये.” यानंतर राहुल तिला उचलून घेतो आणि स्टेजवर जातो. तिथे उपस्थित सर्व पाहुणे दोघांना चिडवताना दिसले.

या फोटोंमध्ये श्रद्धा मरून रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तसेच तिच्या दागिन्यांमुळे या लग्नाच्या लूकमध्ये भर पडली आहे. तिच्या लग्नाचे सर्व विधी दिल्लीत पार पडले. त्याचवेळी, तिच्या लग्नात श्रद्धाने पाहुण्यांसोबत जोरदार पोझही दिल्या.

श्रद्धा हे फोटो चाहत्यांना खूप आवडत असून, या फोटोंवर ते जोरदार कमेंट करत आहे. यासोबतच या जोडप्याला अनेक चाहते अभिनंदन आणि शुभेच्छाही देत आहेत. याआधी तिची मेहंदी आणि साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

या फोटोंमध्ये ती एका हाताने चेहरा लपवत आहे, तर दुसऱ्या हातात ती तिची साखरपुड्याची रिंग फ्लॉंट करत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ती तिच्या हातावर मेहंदी दाखवताना दिसली. हे फोटो शेअर करत श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वात सोपे होय जे मी कधी सांगितले आहे!” तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिवसा पूजा केली जाते, तर रात्री महिलांवर…’, वादग्रस्त विधानानंतर कॉमेडियन वीर दासने दिले स्पष्टीकरण

-Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात

-बायकोची प्रगती बघवेना, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडून पत्नीला मारहाण; कौटुंबिक हिंसाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल

हे देखील वाचा