Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मग या पाच जणांना वाचवून दाखव ना!’ जयच्या वक्तव्यावर मांजरेकरांनी वीकेंडला केला संताप व्यक्त

‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात चावडी चांगलीच रंगात आली आहे. खेळ खेळताना स्पर्धकांना स्वतःचे भान राहत नाही आणि हा खेळ त्यांच्या जीवाशी येतो. अशीच एक घटना घरात घडली आहे. साप्ताहिक कार्यात स्पर्धक बेभान झाले होते आणि ते जिंकण्यासाठी कसलाही विचार करत नव्हते. बिग बॉसने वारंवार सूचना देऊन देखील स्पर्धकांनी त्यांची मर्यादा सोडली आणि त्यांच्यात हाणामारी झाली. घरात गायत्री दातार हिच्या खांद्याची इअरलाईन फ्रॅक्चर झाली आहे.

त्यामुळे या आठवड्यात मांजरेकरांनी घरातील सदस्यांना चांगलेच झापले आहे. ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना ओरडले आहेत, तर ज्यांनी प्रामाणिक खेळ खेळला त्यांचे कौतुक केले आहे. अशातच या आठवड्यात विकास आणि जयमध्ये जोरदार भांडण झाले होते. अगदी हाणामारी करण्यावर त्यांचे भांडण आले होते. त्यावेळी जय विकासला म्हणाला होता की, “गेले सात आठवडे मी तुला वाचवले आहे.” यावरून मांजरेकरांनी वीकेंडला त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. (Bigg Boss Marathi 3 : mahesh Manjrekar scold on jay dudhane in weekend)

मांजरेकर विचारतात या आठवड्यात कोण कोण नॉमिनेट आहेत? यानंतर ते जयला विचारतात की, “जय तू कोणाकोणाला वाचवशिल? कोणाकोणाला वाचवण्याची तुझ्यात ताकद आहे.” यावर जय उत्कर्षचे नाव घेत असतो. यावर मांजरेकर म्हणतात की, “कसा वाचवणार तू? त्यांना अपील करणार का?” यावर जय म्हणतो की, “नाही सर तसं नाही.” यावर मांजरेकर म्हणतात की, “मग यांना वाचव ना.” यानंतर मांजरेकर त्याला त्याची चूक दाखवून देतात की, बाहेर जनता जे व्होटिंग करते त्यावर तुमचा निकाल ठरतो. त्यामुळे या घरात कोणीही कोणाला वाचवत नाही.

हे ऐकून जय एकदम शांत होतो आणि नंतर काहीच उत्तर देत नाही. यासोबत मांजरेकर मीराला देखील खूप ओरडतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा