Saturday, April 4, 2026
Home बॉलीवूड सलमान खानने तरुण कलाकारांना दिला खास संदेश, म्हणाला, ‘मेहनत करा आम्ही अजूनही…’

सलमान खानने तरुण कलाकारांना दिला खास संदेश, म्हणाला, ‘मेहनत करा आम्ही अजूनही…’

मागील काही वर्षापासून ओटीटीला खूप प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउनदरम्यान जेव्हा सगळे चित्रपटगृह बंद होते, तेव्हा प्रेक्षकांनी ओटीटीला खूप प्रतिसाद दिला. ओटीटीवरून केवळ चांगला आणि वेगळा विषय मिळत नाही, तर अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळत आहे. ओटीटीची वाढ बघता यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत की, यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची लोकप्रियता कमी होत चालली आहे.

याबाबत आता सलमान खानने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.‌ सलमान खानचा ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट चित्रपटगृहात तसेच ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला होता. सलमान खानचे असे म्हणणे आहे की, हिंदी इंडस्ट्रीचे स्टारडम कधीही संपणार नाही. (Salman Khan message for young to do more work)

माध्यमातील वृत्तानुसार, सलमान खानला विचारले होते की, सुपरस्टारचे हे शेवटचे दशक आहे कारण आता प्रेक्षक ओटीटीकडे जास्त धाव घेत आहेत. जिथे कलाकारांना जास्त लोकप्रियता मिळत आहे. यावर सलमान खानने उत्तर दिले की, “आपण गेलो तर इतर कोणीतरी येईल. मला नाही वाटत कलाकारांचा काळ कधी संपेल. ते नेहमीच असेच राहणार आहे. आता हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. जसे की चित्रपटाची निवड. प्रत्येक तरुण पिढीचा त्यांचा एक स्टारडम असणार आहे.”

सलमानने पुढे सांगितले की, “मी बरेच दिवसापासून ऐकत आहे की, कलाकारांचा काळ संपला आहे. मी हे गेल्या ४ पिढ्यांपासून ऐकत आलो आहे की, ही शेवटची पिढी आहे. परंतु तरुणपिढीसाठी हे आपण सोडणार नाही. आम्ही ते त्यांना सहज देणार नाही. मेहनत करा, जे आम्ही आता देखील मेहनत करत आहोत तर तुम्ही पण करा.”

सलमान खानच्या आगामी चित्रपटात बाबत बोलायचे झाल्यास, तो ‘अंतिम : द फायनल त्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे. ते आयुष खलनायक आहे. हा चित्रपट बघण्यासाठी सगळेच खूप उत्साहित आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा