कलाकार आणि सोशल मीडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सोशल मीडियावर कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. मागील काही काळापासून सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात एन्ट्री घेतल्यामुळे कलाकार आणि फॅन्स यांच्यातली दरी कमी होऊन फॅन्स थेट आपल्या आवडत्या कलाकारांशी जोडले गेले. आपल्या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर फॉलो करून त्यांच्या अपडेट फॅन्स मिळवत असतात. आजच्या काळात कलाकारांसाठी सोशल मीडिया एक महत्वाचे माध्यम आहे. या सोशल मीडिया अकाउंटवर कलाकारांना लाखो लोकं फॉलो करतात. अशातच जेव्हा हा फॉलोवर्सचा आकडा एका विशिष्ट टप्पा ओलांडतो तेव्हा कलाकार एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानतात. अभिनेत्री रूपाली गांगुलीची सध्या याच आशयाची एक पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
नुकतेच रूपाली गांगुलीचे इंस्टग्राम अकाऊंटवर २ मिलियन फॉलोवर्स झाले असून, या मोठ्या गोष्टीचे सेलिब्रेशन रूपालीने खूपच अनोख्या अंदाजात करत सर्वांचे आभार मानले आहे. रूपालीने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, यात ती तिच्या दोन महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहे. एक तर साराभाई व्हर्सेस साराभाई मधील ‘मोनिशा’ आणि अनुपमा मधील ‘अनुपमा’. या दोघींची भेट आणि त्यांच्यात झालेला संवाद या व्हिडिओमधून रूपालीने मजेशीर पद्धतीने सर्वांसमोर आणला आहे.
या व्हिडिओमध्ये मोनिशा झालेली रूपाली अनुपमाकडे दोन ऑटोग्राफ मागते. यावर अनुपम तिला दोन ऑटोग्राफ का पाहिजे विचारते त्यावर मोनिशा ती दुसरे ऑटोग्राफ एकाला विकून त्यातून पैसे मिळवेल असे म्हणते. या गोष्टीला अनुपमा नकार देते. या व्हिडिओमध्ये रूपाली मोनिशा आणि अनुपमा या दोघींसारखी तयार झाली असून, ती अतिशय सुंदर दिसत आहे.
रूपालीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “तुमच्या दोन प्रसिद्ध भूमिकांसोबत २ मिलियनच्या आठवड्याची सुरूवात करत आहे. एक अभिनेत्री म्हणून मी जे केले त्याला तुम्ही जो पाठिंबा दिला, आधार दिला, कौतुक केले त्यासाठी धन्यवाद. तुमच्या प्रेमाला पाहून मी भावुक, विनम्र आणि आभारी आहे. तुम्हाला समजले असेलच या दोघी कोण आहेत? तुम्ही यांना अजून बघू इच्छिता?”
सध्या रूपाली आपल्याला अनुपमा या मालिकेत दिसत असून, ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये सर्वातवर आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात फुल्ल ऑन ड्रामा पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक या मालिकेला तुफान प्रतिसाद देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किसिंग सीनमध्ये लारा दत्ताला नाही कोणतीही अडचण, सांगितली कशी होती पती महेश भूपतीची प्रतिक्रिया
-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ
-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा