स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले. मालिकेची कहाणी अगदी सर्व सामान्यांना भावणारी आहे. परंतु या मालिकेतील काही कलाकर मात्र चांगलेच चर्चेत असून मालिकेला गालबोट लागत चालले आहे. मागील काही दिवसांपूर्वी मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा हिने मालिकेच्या कलाकारांवर आरोप लावले होते. हो गोष्ट शांत होत नाही, तर या मालिकेतील अभिनेत्री स्वाती भादवे (Swati Bhadave) हिने मालिकेचे प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे (Swapnil Lokhande) यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
मालिकेतील स्वाती ही नंदिता पाटकर (Nandita Patkar) हिची डबल बॉडी साकारत होती. म्हणजेच, ज्यावेळी नंदिता सेटवर उपस्थित नसायची तेव्हा स्वाती नंदिता पाटकरची भूमिका साकारायची. नंदिता पाटकर काही कारणास्तव मालिकेच्या सेटवर उशिरा पोहचत असे. तोपर्यंत स्वाती तिचे पात्र निभावत होती. मात्र, आता तिने स्वप्नीलवर आरोप केल्याने ती खूपच चर्चेत आहे. (Actress swati bhadave files fir against sahkutumb sahparivar production controller )
तिने सांगितले की, “मी गेल्या अनेक दिवसापासून ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत काम करत आहे. प्रोडक्शन कंट्रोलरने माझ्याकडे फोन नंबर मागितला होता. मी पुण्यातून काम करू शकते की, नाही असे त्याने मला विचारले. मी हो म्हणत कुठूनही काम करू शकते असे सांगितले. त्यानंतर त्याने मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे, असे सांगितले. मी त्याला कमिशन देईन असे सांगितले. मात्र, त्याने नकार देत म्हटले की, मला आणखी काहीतरी हवे आहे.”
स्वातीने पुढे सांगितले की, “त्याला माझ्याकडून शारीरिक संबध ठेवायचे होते. मला ते अजिबातच मान्य नव्हते, तर धक्कादायक होते.” या मुलाखतीमध्ये स्वातीने या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे सांगितले आहे. स्वप्नील विरोधात तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याला ३० नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते.
स्वाती भादवे हिने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेव्यतिरिक्त ‘मोलकरीण बाई’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’, ‘हे मन बावरे’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ यांसारख्या गाजलेल्या मराठी मालिकांमधून स्वातीला छोट्या- छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा
–‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच
-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता










