Thursday, October 22, 2026
Home › मराठी › अभिज्ञा भावेचा ग्लॅमरस अंदाज घालतोय चाहत्यांना भुरळ, एकदा नजर टाकाच

अभिज्ञा भावेचा ग्लॅमरस अंदाज घालतोय चाहत्यांना भुरळ, एकदा नजर टाकाच

मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. तिची पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत.

अभिज्ञाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तिची बोल्ड पर्सनॅलिटी दिसत आहे. तिने चंदेरी रंगाचा टॉप आणि पँट परिधान केली आहे. तिने कानात डायमंडचे‌ ईअरिंग घातले आहेत. तसेच केस मागे बांधलेले दिसत आहे. फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Abhidnya bhave’s glamorous look viral on social media)

अभिज्ञा ही एक स्टायलिश अभिनेत्री आहे. तिची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिचा हा लूक देखील सगळ्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा लूक लोकमत दिया पुरस्कार २०२१ मधील आहे. या पुरस्कार सोहळ्यात जोश मराठी सुपरस्टार हा पुरस्कार मिळाला.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे.

या मालिकेत ती अर्चनाच्या वहिनीचे म्हणजे मंजुषाचे पात्र साकारत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे. याआधी देखील तिने अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण तरीही तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे. या शोमध्ये तिच्या विनोदी अंदाजाने तिने आख्खा महाराष्ट्राला हसवले आहे.

हे देखील वाचा