Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कह दू तुझे या चूप रहू’, इंद्राला करायचे आहे दिपूला प्रपोज, पण कसे?

झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’  मालिकेने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेची कहाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेने प्रोमोपासूनच सगळ्यांची मने जिंकून घेतली आहे. मालिकेचे खास आकर्षण म्हणजे मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. ऋताचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्यांना तिचे या मालिकेतील साधे आणि सोज्वळ पात्र खूप आवडत आहे. मालिकेत तिच्यासोबत अजिंक्य राऊत हा मुख्य भूमिकेत आहे. ऋता आणि त्याची केमेट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यांच्यातील प्रेम आता कुठे खुलत आहे. त्यामुळे प्रेमातील सगळ्या गोष्टी पाहायला सगळ्यांना आनंद होत आहे.

असतच मालिकेतील इंद्रा म्हणजेच अजिंक्यचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो दिपूला प्रपोज करण्याची तयारी करत आहे. यात एक गाणे म्हणत तिला प्रपोज करण्याची तयारी करत आहे. व्हिडिओमध्ये तो मालिकेच्या सेटवर दिसत आहे. तो ‘कह दू तुझे या चूप रहू’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये ऋता देखील दिसत आहे.  (man udu udu zal actor ajinkya raut’s video viral on social media)

हा व्हिडिओ झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “इंद्राला दिपूला प्रपोज करायचंय पण कसं ?” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या डॅशिंग हिरोला रोमँटिक अंदाजात पाहून सगळ्यांना खूप आनंद होत आहे. त्याचा हा नवीन अंदाज सोशल मीडियावर व्हायला होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

मालिकेचा ट्रॅक सध्या चांगलाच इंटरेस्टिंग झाला आहे. इंद्राला दिपू आवडते त्याने ही गोष्ट तिला देखील माहिती आहे, परंतु घरी बाबांच्या भीतीने दिपू त्यांचे नाते घेऊन जात नाही. परंतु आता त्यांची प्रेमकहाणी कशी असणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

लिव्ह इन रिलेशनशिपला लागली नजर! सुष्मिताने केले बॉयफ्रेंडला बेघर?

‘काही गोष्टी करायला धाडस लागतं’, म्हणत श्रेया बुगडेने केला ‘या’ खलनायिकेचा अभिनय

अहान शेट्टीपासून महिमा मकवानापर्यंत, ‘या’ कलाकारांनी २०२१ मध्ये केलं बॉलिवूड विश्वात पदार्पण 

 

हे देखील वाचा