मराठी टेलिव्हिजनवर जेव्हा सोज्वळ अभिनेत्रींचे नाव निघते तेव्हा अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या नावाचा त्या यादीत हमखास समावेश असतो. ऋतुजाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण प्रत्येक पात्रता ती सोज्वळ अंदाजात दिसली आहे. ऋतुजा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती बहुतांश वेळा तिचे साडीमधील फोटो शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, या व्हिडिओमध्ये ती एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिची मैत्रीण आणि अभिनेत्री अश्विनी केसकर दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघीही एकमेकींशी इंग्लिशमध्ये डायलॉग म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर वाटत आहे. व्हिडिओमध्ये ऋतुजा वेडेवाकडे हावभाव करताना दिसत आहे. (Rutuja bagwe share her funny video on social media)
अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. ऋतुजाचे अनेक चाहते तसेच कलाकार देखील या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर अश्विनी केसकर, मिताली मयेकर , फुलवा जामकर, गौरी कुलकर्णी, अक्षय गुरव यांनी मजेशीर कमेंट केल्या आहे. खास करून सगळेजण ऋतुजाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. तसेच तिचे चाहते ते सातत्याने या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.
यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.
हेही वाचा :
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
साधेपणातील सौंदर्य, चाहत्यांना भावले माधुरी दीक्षितचा सिंपल अँड सोबर लूक