Sunday, April 5, 2026
Home वेबसिरीज धक्कादायक! शूटिंग दरम्यान मुंबईत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड; आरोपीला अटक

धक्कादायक! शूटिंग दरम्यान मुंबईत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड; आरोपीला अटक

आपण नेहमीच महिलांसोबत होणाऱ्या बलात्काराच्या, विनयभंगाच्या बातम्या वाचतो, ऐकतो, पाहतो. सध्या तर सामान्यांपासून खास सेलिब्रिटी महिलांपर्यंत सर्वच स्त्रिया अशा दुर्दैवी घटनांच्या बळी ठरताना दिसत आहे. नुकतेच एका अभिनेत्रीला अशाच प्रकारच्या छेडछाडीचा सामना करावा लागला आहे.

अतिशय चकीत करणारी ही घटना मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका अभिनेत्रीसोबत घडली आहे. या छेडछाडीच्या आरोपाखाली एका २२ वर्षीय तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे. सदर आरोपीने हॉटेलच्या ३७ व्या मजल्यावर अभिनेत्रींसोबत छेडछाड केली आहे.

पीडित अभिनेत्री त्या हॉटेलमध्ये एका वेबसिरीजच्या शूटिंगसाठी गेली होती. तिचे शूटिंग संपल्यानंतर ती हॉटेलच्या चेंजिंग रूमध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. याच कालावधीत आरोपीने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करत तिच्यासोबत छेडछाड केली. आरोपीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अभिनेत्रीने भान राखत इमर्जन्सी अलार्म वाजवला. हा अलार्म ऐकून हॉटेलचा स्टाफ आणि मेंबर्स तिथे पोहोचले आणि त्यांनी तिची मदत केली.

मुंबई पोलिसांनी आरोपी विरोधात छेडछाडीच्या गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्या आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-

‘असा’ दिसत होता २८ वर्षांपूर्वी कपिल शर्मा; रियॅलिटी शो जिंकल्यानंतर मिळाले होते तब्बल ‘इतके’ लाख रुपये, पहिल्याच कष्टाच्या कमाईतून केले होते बहिणीचे लग्न

हे देखील वाचा