मंगळवारी (२ फेब्रुवारी) दुपारी गोरेगाव फिल्म सिटी अदिपुरूषच्या शुटींगसाठी सेट उभारण्यात आला होता. या सेटलाच आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनास्थळी अग्नीशमन दल पोहोचल्यावर त्यांनी ५०हून अधिक कलाकारांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बऱ्यापैकी वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोरेगावच्या बांगूर नगरमधील एका स्टुडिओला मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची बातमी मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची घटनास्थळी पोहचत, आग विझवण्याचे काम सुरू केले. या स्टुडिओमध्ये बऱ्यापैकी लाकडी फर्निचर असल्याने हे आगीला पूरक ठरले आणि आग वाढत गेली. आग वाढल्याने आगीचे आणि धुराचे लोट अनेक किलोमीटरपर्यंत दिसत होते.
#WATCH I Mumbai: A fire has broken out at a studio in Goregaon; 8 fire tenders present at the spot. No injuries reported yet. More details awaited. pic.twitter.com/GJ9pNB0q0x
— ANI (@ANI) February 2, 2021
या आगीमध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत असताना अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची काष्ठा करत ही आग नियंत्रणात आणली. आग लागल्याची बातमी परिसरात पसरल्याने बघ्याची खूप गर्दी इथे झाली होती. त्यामुळे जवानांना ही आग विझवताना खूप अडचणी देखील आल्या.
Dear @AUThackeray .
The representatives of the residents around d studio which caught fire at #BangurNagar , Goregaon (W) would like to meet you at your convenience .
Their lives are under threat due to this illegal activity happening on this open space .
Thanks. pic.twitter.com/7aRyNG0jI9— Ashoke Pandit (@ashokepandit) February 2, 2021
ज्या स्टुडिओला आग लागली तो स्टुडिओ बंद होता. त्यामुळे कदाचित ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा-
क्या बात! ७० वर्षांच्या जया बच्चन यांनी ठरला ठेका, ‘पल्लो लटके’ गाण्यावर केला खास डान्स
हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या ऋतिकची वाट अडवणे मुलाच्या अंगलट; घेतला चांगलाच समाचार
‘दबंग खान’ची टेस्ट! कपिल शर्माने सलमानला विचारली कॅटरिनाच्या ६ बहिणींची नावे; पाहा पुढे काय झालं










