हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता डस्टीन डायमंडचे वयाच्या ४४ व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले. डस्टीन कँसरशी लढाई करत होता. मात्र, त्याला अखेर या लढाईत अपयश आले आणि त्याने सोमवारी (१ फेब्रवारी) या जगाचा निरोप घेतला. डस्टीनला ‘सेव्ह बाय द बेल’ सारख्या सुपरहिट सीरिजसाठी ओळखले जाते. त्याच्या जाण्याने संपूर्ण हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. डस्टीनला नुकतेच अग्रेसिव्ह कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. मात्र, निदानाच्या फक्त तीन आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला.
डस्टीनचा एजेंट असलेल्या रॉजर पॉलने सांगितले की, डस्टीनला हा आजार खूप जास्त सहन करावा नाही लागला. त्याचे फक्त काही दिवसातच निधन झाले. आता आम्हाला या गोष्टीमुळे जरा बरं वाटते की, त्याला या आजारामुळे कठीण त्रास सहन करावा लागला नाही.
मूळच्या कॅलिफोर्नियाच्या असणाऱ्या डस्टीनने ‘गुड मॉर्निंग मिस ब्लिस’ने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याच्या ‘स्क्रीच’ या भूमिकेला अमेरिकेतच नाही, तर संपूर्ण जगात खूपच जास्त लोकप्रियता मिळाली. मात्र, यानंतर त्याला अपेक्षित यश मिळवता आले नाही.
‘सेव्ह बाय द बेल’नंतर काही टीव्ही शो वगळले, तर त्याने छोट्या छोट्या अनेक भूमिका केल्या. सन २०१५ साली त्याला हत्यार बाळगल्या प्रकरणी आणि बारमध्ये झालेल्या भांडणामुळे ४ महिन्यांची शिक्षा देखील झाली होती. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची १ महिन्याची शिक्षा कमी झाली होती.
डस्टीन हा त्याच्या स्टॅन्डअप कॉमेडीसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या एजेंटने सांगितले की, “आम्हाला माहित आहे की, मागच्या काही काळापासून डस्टीनची प्रेक्षकांमध्ये असलेली प्रतिमा खराब झाली होती. पण डस्टीनने कधीच चुकीची वागणूक मुद्दाम केली नव्हती. त्याला त्याचा त्रास सहन होत नसल्याने त्याच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या, ज्या घडायला नको होत्या.”
Deeply saddened to hear of the passing of Dustin Diamond, a true comedic genius. My sincere condolences to his family and friends. Looking back at our time working together, I will miss those raw, brilliant sparks that only he was able to produce. A pie in your face, my comrade.
— Mark-Paul Gosselaar (@MPG) February 1, 2021
Dustin, you will be missed my man. The fragility of this life is something never to be taken for granted. Prayers for your family will continue on… pic.twitter.com/BnxY9XgN5g
— Mario Lopez (@mariolopezviva) February 1, 2021
Screech really carried Saved By the Bell. Dustin Diamond ????????????????
— OLONI BABY (@Oloni) February 1, 2021
डस्टीनच्या निधनावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा-
ज्येष्ठ बंगाली अभिनेते इंद्रजित देब यांचे निधन, ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शरमन जोशींचे वडील आणि गुजराती मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकार अरविंद जोशी यांचे निधन










