Sunday, March 8, 2026
Home साऊथ सिनेमा जेव्हा प्रभासने बसमधील गुंडाची केली होती जोरदार धुलाई, पाहुन विसरून जाल ‘बाहुबली’ची फाईट

जेव्हा प्रभासने बसमधील गुंडाची केली होती जोरदार धुलाई, पाहुन विसरून जाल ‘बाहुबली’ची फाईट

अभिनेता प्रभासची (Prabhas) गणना आज दक्षिणेतील टॉप कलाकारांमध्ये केली जाते. ‘बाहुबली’पूर्वीही प्रभासने अनेक हिट चित्रपट दिले असले, तरी एसएस राजामौलीच्या या चित्रपटाने त्याचे नशीब बदलले. प्रभासला आंतरराष्ट्रीय स्टार बनवण्याचे श्रेय फक्त ‘बाहुबली’ला जाते. ‘बाहुबली’मध्ये प्रभासने न्यायाचे समर्थन करताना अधर्मावर आपला विजय कसा प्रस्थापित केला, हे तुम्ही पाहिले होते. भल्लाल देव आणि बाहुबली यांच्यातील लढाई हा या चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा सीन होता, जो अतिशय शानदार पद्धतीने चित्रित करण्यात आला होता. तर, ही चर्चा होती बाहुबली चित्रपटाची. पण सध्या प्रभासचा आणखी एक व्हिडिओ खूप लाइक केला जात आहे. या व्हिडिओमध्ये साऊथ स्टार बसमधील गुंडांना मारहाण करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रभास बसमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळांना धडा शिकवत आहे. त्याच्या जबरदस्त फायटिंगचा व्हिडिओ चाहते सध्या खूप एन्जॉय करत आहेत. तसे, ही खरी घटना नसून प्रभासच्या चित्रपटातील एक सीन आहे जो, खूप पसंत केला जात आहे. त्याचबरोबर या व्हिडिओतील प्रभासचा लूकही खूपच वेगळा दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. (prabhas superhit filmy scene when prabhas beat up goons in bus you will forget bahubali fight)

प्रभासचे चित्रपट
अभिनेता प्रभासचे २०२२मध्ये अनेक चित्रपट रिलीझ होणार आहेत. यावर्षी प्रभास ‘राधे श्याम’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे आहे. याशिवाय त्याचा ‘आदिपुरुष’ही प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तो प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे, तर क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. त्याचवेळी त्याचा ‘सालार’ही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा