Monday, June 23, 2025
Home मराठी ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अशाप्रकारे केले जाते कोरोना नियमांचे पालन, पाहा फोटो

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अशाप्रकारे केले जाते कोरोना नियमांचे पालन, पाहा फोटो

कोरोनामुळे पूर्ण जगाची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक गोष्टीवर परिणाम जाणवला आहे अगदी कोणताही व्यवसाय असुदे त्याला या संकटाचा सामना करावा लागला आहे. कोरोनाची जशी महामारी आली तशी पूर्ण जग थांबलं होत. पहिली लाट आली आणि या महामारीच गांभीर्य सगळ्यांना कळलं. लॉक डाऊन झाल्यावर याचा परिणाम सगळ्या क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या संकटातून अगदी हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीही सुटली नाही. कधीही न थांबलेल मनोरंजन अचानक बंद झालं. याचा फटका अनेक कलाकारांना, निर्मात्यांना झाला. अनेक मालिका बंद झाल्या तर अनेक मालिका अर्ध्यातच संपवाव्या लागले. कोरोनाची पहिली लाट आली आणि मनोरंजन क्षेत्रही ठप्प झाले. त्यानंतर अनेक निर्बंध लागून मनोरंजन चित्र पुन्हा सुरू झालं होतं. अनेकांनी महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, रामोजीफिल्म सिटी यासारख्या ठिकाणी जाऊन शूटिंग करणे पसंत केले. कारण तिथे त्या राज्यातून निर्बंध कमी होते. दुसऱ्या लाटेतून मनोरंजन क्षेत्र थोडफार तग धरत होते, तर आता सरकारकडून तिसरे निर्बंध जाहीर झाले आहेत याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रात देखील होतो आहे. (aai kuthe kay karte actors taking care in corona phase on set)

तिसऱ्या लाटेचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावर होऊ नये, यासाठी मनोरंजन क्षेत्र पुन्हा तयारी करत आहे. या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी पुन्हा सज्ज आहे. सरकारने नवीन निर्बंध लागून दिलेले आहेत या नवीन नियमांचा पालन करून  निर्मात्यांनी आपल्या कलाकारांना तंत्रज्ञांना नियमांचं काटेकोर पालन करून शूटिंग करण्यास सांगितल आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील निर्माते तसेच सज्ज आहेत तसेच अनेक कलाकार देखील सज्ज आहेत.

अशातच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे कलाकार देखील काळजी घेत आहे. या मालिकेच्या सेट्वरुन एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अरुंधती, यश दिसत आहेत. त्यांनी हातात ग्लोज घातले आहेत. तसेच मास्क लावला आहे. त्यांच्या सेटवरील हा फोटो सध्या जोरादार व्हायरल होत आहे. तसेच बाकी मालिकांच्या सेटवर देखील पूर्ण काळजी घेऊन शूटिंग चालू आहे.

प्रत्येक सेटवर नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. शूटिंगच्या जागी आल्यानंतर सॅनिटायझर मास्क यांचा वापर अनिवार्य केलेला आहे. या शिवाय कोणालाही शूटिंगला परवानगी नाही. दर पंधरा दिवसानंतर rt-pcr टेस्ट केले जाते. समजा एखादा पॉझिटिव आल्यास त्या कालावधीसाठी शूटिंग थांबून इतर कलाकारांची टेस्ट केले जाते  आणि योग्य ती काळजी घेतली जाते. हे सर्व नियम निर्मात्यांनी घालून दिलेले आहेत, कारण कोरोनाचा फटका जसा कलाकारांना बसला तसाच निर्मात्याने देखील बसला आहे. मनोरंजन क्षेत्र शूटिंग थांबू नये यासाठी निर्मात्यांनी आणि कलाकारांनी घेतलेला हा योग्य निर्णय आहे.

हेही वाचा :

कार्पोरेट लूक आणि ग्लॅमरस पूजा सावंत, फोटो पाहून चाहत्यांचे हरपले भान

सुपरस्टार महेश बाबूवर भडकले रश्मिका मंदानाचे चाहते, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप

लग्न, अफेअर किंवा गर्भधारणाच नाही, तर खूपच मोठी आहे नुसरत जहाँशी संबंधित वादांची यादी

 

हे देखील वाचा