बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol) यांची जोडी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम जोडी मानली जाते. अजय आणि काजोलची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. दोघांची प्रेमकहाणी ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली. अजय सेटवर शांत असायचा आणि काजोल खूप बोलायची. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. पण दोघांनीही एकमेकांना प्रपोज केले नाही.
अजय आणि काजोल यांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर २४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांचे लग्न मराठी रितीरिवाजाप्रमाणे झाले होते.
लग्नानंतर हनिमूनला गेले दोन महिने, काजोलने ठेवली होती ‘ही’ अट
अजयने स्वतः सांगितले होते की, काजोलने लग्नानंतर दोन महिन्यांसाठी हनिमूनला जाण्याची अट घातली होती. त्याचवेळी काजोलने सांगितले की, “हनिमूनच्या वेळी जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया, लॉस वेगास आणि इतरत्र ४० दिवसांनी ग्रीसला पोहोचलो तेव्हा अजय पूर्णपणे थकला होता. एके दिवशी सकाळी त्याला जाग आली आणि त्याने ताप आणि डोकेदुखीची तक्रार केली.”
काजोल म्हणाली होती की, तिने अजयला विचारले की, सांग काय करू? यावर अजय देवगण म्हणाला होता की, घरी जाऊ. अशा प्रकारे दोघेही हनिमूनवेळी निम्म्यातून मुंबईला परतले. त्याचवेळी अजय देवगणने सांगितले की, त्याला हनीमूनसाठी दोन महिन्यांची सुट्टी अधिक वाटू लागली होती.
काजोल -अजय दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक मानली जाते. हे दोघेही बॉलिवूडचे सर्वात हॉट कपल मानले जातात. हे हॉट कपल्स अनेकदा सोशल मीडियाच्या चर्चेत असतात, पण आता फक्त अजय देवगण आणि काजोलच नाही, तर त्यांची मुलगी न्यासाही सोशल मीडियावर चर्चेत असते.
हेही वाचा :










