देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत मागील अनेक दिवसापासून खालावली आहे. मध्यंतरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. परंतु नुकतेच अशी माहिती समोर आली आहे की, लता दीदींची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे आणि त्यांना वेंटीलेटरवर ठेवले आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार लता दीदींची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आयसीयूमध्ये ठेवले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मागील २७ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. (lata mangeshkar health update)
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले होते की, “मी लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो. त्या ब-या होत आहेत. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या, पण आता त्यांचे व्हेंटिलेटरही काढून टाकण्यात आले आहे. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्या व्हेंटिलेटवर नाही. त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लता दीदी सतत डोळे उघडत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.’
परंतु नुकत्याच आलेल्या माहितीनुसार लता दीदींची तब्येत खालावली असून चाहते त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
ऐंशीच्या दशकात गाजवली चित्रपटसृष्टी, आता नक्की कुठे आहेत अभिनेते राजकिरण?
ऐश्वर्या रॉयचे लग्न पाहण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने वापरली होती दुर्बीण, झाला ‘त्या’ घटनेचा खुलासा
अभिनयाचा वारसा असूनही अभिषेक बच्चनला करावा लागला होता चित्रपटसृष्टीत संघर्ष, वाचा त्याची कहाणी










