Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड कॅमेऱ्यासमोर पुन्हा बोल्ड झाली ईशा गुप्ता, जॅकेटची बटणं काढत केलं फोटोशूट

कॅमेऱ्यासमोर पुन्हा बोल्ड झाली ईशा गुप्ता, जॅकेटची बटणं काढत केलं फोटोशूट

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोवर चाहते नेहमीच फिदा होत असतात. तिच्या या घायाळ करणार्‍या सौंदर्यावर सगळेच मोहित होत असतात. म्हणूनच ईशा गुप्ताला सुपरहॉट अभिनेत्रीचा टॅग मिळाला आहे. आता ईशाने पुन्हा एकदा आपले बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ताचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याने तिने चित्रपट क्षेत्रात नाव कमावले आहे. ईशा गुप्ता आपल्या चित्रपटांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमीच असे बोल्ड फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने बोल्डनेसच्या सगळया मर्यादा पार केल्या आहेत.

तिच्या या व्हायरल फोटोमध्ये ईशाने आपले केस मोकळे सोडत कॅमेऱ्यासमोर सुंदर पोझ दिल्या आहेत. या फोटोमध्ये ईशाने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. अनेक फोटोमध्ये तिने जॅकेटची बटने उघडी ठेवून हॉट लूक दिला आहे. ईशाने काळ्या रंगाच्या जॅकेटसोबत काळ्या रंगाची ब्रा घातली आहे. तिच्या या हॉट लूकवर तिचे चाहते खूपच फिदा झाले आहेत. हे फोटो तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

याआधीही ईशाने काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये फोटोशूट करत आग लावली होती. तिच्या या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली होती. दरम्यान ईशा लवकरच बॉबी देओलसोबत ‘आश्रम ३’ या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. याआधी आश्रम सिरीजचे दोन्ही भाग तुफान लोकप्रिय ठरले आहेत. आता प्रेक्षकांना ‘आश्रम ३’ ची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा