दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. तिच्या आणि अभिनेता धनुषच्या (Dhanush) घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून ऐश्वर्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या. काही दिवसांपुर्वी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा ती रुग्णालयात दाखल झाली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली आहे.
ऐश्वर्या रजनीकांत काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात असताना तिने अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्याने रग्णालयात दाखल झालेले फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती रुग्नालयाच्या बेडवर बसल्याचे दिसत आहे. तिच्या हातावर ड्रिपही लावला आहे. तिच्या बेडशेजारी एक महिला उभी आहे, जिच्याशी ती गप्पा मारत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “कोविडच्या आधीचे आणि कोविडच्या नंतरचे आयुष्य, पुन्हा एकदा ताप आणि चक्कर येत आहे. आणखी बरेच काही, मात्र सगळ्यात प्रेमळ, प्रेरणादायी डॉक्टर जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा वाईट वाटत नाही. महिला दिनाची काय सुंदर सुरूवात झाली आहे.” सध्या तिचे हे फोटो सर्वत्र चर्चेत आहेत.
दरम्यान १७ जानेवारी २०२२ ला ऐश्वर्या आणि धनुषने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. दोघांचा सुखी संसार सुरू असताना हा निर्णय त्यांनी का घेतला असावा, हाच प्रश्न त्यांच्या प्रत्येक चाहत्याला पडला होता. या बातमीने सगळीकडेच उलटसुलट चर्चा रंगली होती.
हेही वाचा –