Saturday, May 23, 2026
Home कॅलेंडर पी.व्ही. सिंधूलाही आवरला नाही ‘कच्चा बादाम’ गाण्यावर थिरकण्याचा मोह, शेअर केला भन्नाट व्हिडिओ

पी.व्ही. सिंधूलाही आवरला नाही ‘कच्चा बादाम’ गाण्यावर थिरकण्याचा मोह, शेअर केला भन्नाट व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे ‘कच्चा बादाम’ गाण्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की, आत्तापर्यंत लाखो लोकांनी या गाण्यावर रिल्स बनवले आहेत. यामध्ये सामान्य प्रेक्षकांसह अनेक हिंदी चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. यामध्ये आता बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूच्याही (P.V. Sindhu) नावाचा आता समावेश झाला आहे. सध्या सोशल मीडियावर पी.व्ही सिंधूचा ‘कच्चा बादाम’ गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध बॅडमिंनटनपटू पी.व्ही सिंधू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडिओची सगळीकडे चर्चा सुरू आहे. यामध्ये सिंधूचा दमदार डान्स पाहून तिचे चाहते चांगलेच मोहित झाले आहेत. या व्हिडिओत पी. व्ही सिंधू ‘कच्चा बादाम’ या व्हायरल गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिच्या हूक स्टेप पाहुन चाहते चकित झाले आहेत. सिंधूच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सिंधुने प्रेमाच्या इमोजीही शेअर केल्या आहेत.  पी.व्ही सिंधूही दिग्गज बॅडमिंटनपटू म्हणून ओळखली जाते. तिने दोन वेळा ऑलिंपिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. नुकतीच ती जर्मन ओपनमधून बाहेर झाली आहे.

दरम्यान ‘कच्चा बदाम’ या गाण्याच्या निर्मितीची कथाही खूपच रंजक आहे. भुबन बादायकर नावाच्या एका शेंगदाणे विक्रेत्याने हे गाणे म्हटले होते. जे सगळीकडे व्हायरल झाले होते. या गाण्यामुळे भुबन रातोरात स्टार झाला होता. सध्या या गाण्यावर असंख्य रिल्स आणि गाणी तयार झाली आहेत. त्यामुळे या गाण्यामुळे या गरीब भुबनचे नशीबच बदलले असून तो सध्या सोशल मीडियावरील सगळ्यात चर्चेत असलेला चेहरा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा