अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांच्याबद्दल आधी असे सांगितले जात होते, की ते दोघेही या वर्षाच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण आता हे जोडपे विवाहित असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक, अनेकदा हे जोडपे मंदिरात एकत्र जाताना स्पॉट झाले आहेत आणि आता त्यांनी गुपचूप लग्न केल्याची बातमी आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला त्यांच्या बाजूने अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अलीकडेच बॉलिवूडची सुपरस्टार प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे आणि आता लेडी सुपरस्टार नयनतारालही हे तंत्र फॉलो करायचे आहे. तिही सरोगसीच्या माध्यमातून आई बनू इच्छिते, असे म्हटले जात आहे. (nayanthara planning to have a baby with vignesh shivan before wedding or it just a rumour)
मात्र, नयनतारा किंवा विघ्नेश शिवन यांच्याकडून त्यांच्या कुटुंब नियोजनाबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. तर, ही अफवा देखील असू शकते. कारण ते दोघेही एखाद्या खुल्या पुस्तकासारखे आहेत आणि ते जे काही निर्णय घेतात ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करतात.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नयनतारा आजकाल विजय सेतुपतीसोबतच्या ‘कथू वाकुला रेंडू कादळ’च्या रिलीझच्या प्रतीक्षेत आहे. ज्यामध्ये समंथा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, नयनताराचा बॉयफ्रेंड मंगेतर विघ्नेश शिवन याने त्याचे दिग्दर्शन केले आहे.
याशिवाय नयनतारा ‘कनेक्ट’, ‘गॉडफादर’, ‘लायन’, ‘गोल्ड’ आणि ‘ओ२’मध्येही दिसणार आहे. तर विग्नेश लाइका प्रॉडक्शन निर्मित अजित कुमारच्या ‘AK62’ चे दिग्दर्शन करणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-