Saturday, June 21, 2025
Home कॅलेंडर Birthday | आपल्या अदांनी प्रत्येकाला वेड लावते अनु इमॅन्युएल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासोबत रंगल्या अफेअरच्या चर्चा

Birthday | आपल्या अदांनी प्रत्येकाला वेड लावते अनु इमॅन्युएल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासोबत रंगल्या अफेअरच्या चर्चा

अनु इमॅन्युएलचा (Anu Emmanuel) जन्म २८ मार्च १९९६ रोजी एका मल्याळी ख्रिश्चन कुटुंबात झाला. ती यावर्षी तिचा २६वा वाढदिवस साजरा करत आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. ‘ऍक्शन हिरो बीजू’ या चित्रपटातून तिने कारकीर्दीला सुरुवात केली. याचे दिग्दर्शन ऍब्रिड शाइनने केले होते.

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता नानी (Nani) होता. अभिनेत्री अनु इमॅन्युएलने याच चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. जेव्हा तिच्या ‘महा समुद्रम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला, तेव्हापासून अनु जास्त चर्चेत आहे. यामध्ये ती अभिनेता शरवानंदसोबत रोमान्स करताना दिसली होती. (anu emmanuel love life affair and career story)

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री अनु शरवानंदसोबत लिप लॉक सीन करताना दिसली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. तिच्या चित्रपटाचा हा ट्रेलर व्हिडिओ देखील यूट्यूबवर वन नंबरवर ट्रेंड झाला होता.

अनु इमॅन्युएलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘प्रेमा कडंता’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘रावणसुरात’ही दिसणार आहे.

याशिवाय अनु इमॅन्युएलच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) भाऊ अल्लू शिरिशसोबत लव्ह लाईफबद्दल खूप चर्चेत होती. वास्तविक, ख्रिसमसच्या निमित्ताने दोघांचा एक रोमँटिक फोटो समोर आल्यावर, त्यांच्या अफेअरबद्दल मीडियामध्ये उधाण आलं होतं.

अनु आणि शिरीष यांनी ‘प्रेमा कडंता’ या चित्रपटात काम केले आहे, ज्यातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. गेल्या वर्षी, ख्रिसमसच्या निमित्ताने अल्लू सिरिशने अभिनेत्रीसाठी ख्रिसमस केक पाठवला होता, जो अनुने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. खरं तर त्यानंतरच त्यांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

अनु इमॅन्युएलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘प्रेमा कडंता’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘रावणसुरात’ही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा