बॉलिवूडच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेली सनी लिओनी आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधत असते. ती सोशल मीडियावरही नेहमी आपले फोटो पोस्ट करत असते. तिचा चाहतावर्ग लाखोंच्या घरात आहे, जे तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. आता तिने नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून सनीचे चाहतेही घायाळ झाले आहेत.
सनी लिओनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सनी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. सनीने यासोबतच हॅटही घातली आहे, ज्यावर तिचे नाव लिहिले आहे. तरीही, या टोपीमुळे तिचा चेहरा मात्र दिसत नाहीये. तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर माझे नाव कोणीही विसरले असेल, तर ते माझ्या हॅटवर लिहिले आहे.”
सनीचा हा फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे.
सनी सध्या केरळमध्ये आपला टीव्ही रियॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉए करताना दिसत आहे.
यापूर्वी सनीने आपला पती डॅनियल वेबरसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला होता. याचाही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता, जो भन्नाट व्हायरल झाला होता.
सनीने सन २०११ मध्ये डॅनियलसोबत लग्न केले होते. तिला ३ अपत्य आहेत. त्यातील १ मुलगी आणि २ जुळी मुले आहेत. मुलीचे नाव निशा, तर मुलांचे नाव अशर आणि नूह आहे.
सनी लिओनीच्या शूटिंग दरम्यान गुंडांनी घातला होता राडा
सनी सध्या विक्रम भट्ट यांच्या बहुप्रतिक्षित ‘अनामिका’ वेब सीरिजची शूटिंग करत आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान नुकतेच गुंडांनी राडा घातला होता. यावेळी भट्ट यांनी सनीला वॅनिटी व्हॅनमध्ये सुरक्षितरीत्या पोहोचवले होते. यानंतर त्यांना पैसे देण्यासोबतच शूटिंगची लोकेशनही बदलावे लागले होते. गुंडांनी हे सर्व ३८ लाख रुपयांसाठी केले होते, ज्याबद्दल विक्रम भट्ट यांनी खुलासा केला होता.
माध्यमातील वृत्तानुसार, गुंडांनी विक्रम भट्ट यांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध ऍक्शन दिग्दर्शक आणि स्टंट कोऑर्डिनेटर अब्बास अली मोगुल यांना १३-१४ लाख रुपये देण्यासाठी प्रवृत्त केले होते. एका वृत्तानुसार, विक्रम भट्ट यांच्या सेटवर सनी ‘अनामिका’ची शूटिंग करत होती, तेवढ्यात तिथे फायटर्स असोसिएशनचे लोक घुसले, त्यांनी विक्रम भट्ट यांच्याकडे अब्बासला ३८ लाख रुपये देण्याची मागणी केली. हे रुपये ८ प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी केलेल्या कामासाठी मागितले होते. भट्ट यांनी सांगितले की, “मी थक्क झालो होतो. मला माहिती नव्हते की काय केले पाहिजे, परंतु माझी सर्वात पहिली प्रतिक्रिया सनी लिओनीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची होती.”
सनी नेहमीच आपल्या लूकमध्ये सुंदर दिसत असते. सनीने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने ‘जिस्म २’, ‘जॅकपॉट‘, ‘रागिनी एमएमएस २’, ‘एक पहेली लिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंदाची बातमी! जया बच्चन ७ वर्षांनंतर झळकणार मोठ्या पडद्यावर, पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम
-‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर कृष्णा आणि अर्चना करतायत ‘चोरीचा प्लॅन’, व्हिडिओ झाला ‘लीक’
-‘द रॉक’ होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? अभिनेत्याने उत्सुकता केली जाहीर