Thursday, March 5, 2026
Home नक्की वाचा Ramnavami 2022| कधी पाहिलंय स्मृती इराणीला सीतेच्या भुमिकेत? तर नितिश भारद्वाजने घेतलं रामाचं रूप

Ramnavami 2022| कधी पाहिलंय स्मृती इराणीला सीतेच्या भुमिकेत? तर नितिश भारद्वाजने घेतलं रामाचं रूप

दोन वर्षापूर्वी देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि टीव्हीवरील ‘रामायण’ मालिका सरकारने पुन्हा एकदा सुरू केली. या मालिकेने कोरोना काळात घरात बंदिस्त झालेल्या प्रेक्षकांना पून्हा एकदा तो जूना काळ आठवायला लावला. ही मालिका प्रत्यक्षात पहिल्यांदा जेव्हा समोर आली होती. त्यावेळी या मालिकेने लॉकडाऊन नसतानाही प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. ग्रामीण भागातील लोक हातातली काम सोडून ही मालिका पाहायला आतुर असायचे. राम रावण युद्ध आणि अन्याय अहंकारावर न्यायाने केलेला विजय अशी या मालिकेची कहाणी अनेक वेळा विविध रुपात पडद्यावर साकारली गेली. चला तर मग  रामनवमीनिमित्त आजपर्यंत विविध रुपात  प्रेक्षकांसमोर आलेले रामायण.

रामायण (१९८७)
रामानंद सागर यांचे हे रामायण आजपर्यंत टीव्हीवर सर्वाधिक आवडलेल्या रामायणांपैकी एक आहे. या शोमध्ये अरुण गोविलने राम आणि अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका दमदारपणे साकारली होती. सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने, लक्ष्मणची भूमिका सुनील लाहिरीने आणि हनुमानाची भूमिका दारा सिंगने केली होती. या शोबद्दल लोकांमध्ये एवढा उत्साह होता की, या शोच्या प्रसारणाच्या वेळी रस्ते रिकामे असायचे. या शोला 82 टक्के प्रेक्षकसंख्या असायची. मालिका

रामायण (२००१-२००२)
बलदेव राज चोप्रा (बीआर चोप्रा) आणि रवी चोप्रा दिग्दर्शित, या मालिकेमध्ये नितीश भारद्वाज हे राम आणि सुरिंदर पाल रावणाच्या भूमिकेत होते. झी टीव्हीच्या या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी सीतेची तर गजेंद्र चौहानने दशरथाची भूमिका साकारली होती. पूर्वीच्या रामायणाप्रमाणे याला प्रसिद्धी मिळाली नसली तरी लोकांचे प्रेमही मिळाले.

रावण (२००५ )
या मालिकेमध्ये दिवाकर पुंडिर यांनी राम आणि नरेंद्र झा यांनी रावणाची भूमिका साकारली होती. 2006 मध्ये झी टीव्हीवर रावण ही मालिका सुरू झाली. हा
कार्यक्रम रामायणावर आधारित होता पण रावणाच्या दृष्टिकोनातून बनवला गेला होता. एकंदरीत रावण कसा लंकापती रावण झाला हे या मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले. शिवभक्त असूनही त्याच्यात अहंकार कसा घर करून बसला. तो इतरांवर अत्याचार कसा करू लागला? मालिकेमध्ये रावणाचा
अवतार तपशीलवार पाहायला मिळाला. या मालिकेचे दिग्दर्शन रंजन सिंग यांनी केले होते. या मालिकेचे एकूण 105 भागांसह तीन सीझन प्रसारित झाले.

रामायण (२००८)
नव्या रंगात बनवलेल्या या रामायणात गुरमीत चौधरीने रामाची भूमिका साकारली होती, तर अखिलेश मिश्राने रावणाची भूमिका साकारली होती. हे रामायण स्वतः रामानंद सागर यांचे पुत्र आनंद सागर यांनी केले आहे. हे रामायण लोकांना आवडले पण वडिलांनी मिळवलेल्या प्रसिद्धीच्या तुलनेत हे रामायण अप्रतिम
ठरु शकले नाही. गुरमीतपासून ते अखिलेश मिश्रा यांच्या मालिकेमधील अभिनयाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रामायण (२०१२)
झी टीव्हीवर २०१२ मध्ये रामायण पुन्हा एकदा लोकांसमोर दाखवण्यात आले. या मालिकेकडून लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र यावेळी लोकांनी ही मालिका पूर्णपणे नाकारला होती. हा शो कधी आला आणि कधी निघून गेला हेच समजले नाही. या रामायणात रामाची भूमिका गगन मलिकने केली होती आणि रावणाची भूमिका सचिन त्यागीने केली होती.

राम सिया के लवकुश (२०१९) 
या मालिकेमध्ये प्रामुख्याने राम सीता आणि लव कुश दाखवण्यात आले आहेत. मात्र, जिथे रामाचा उल्लेख आहे तिथे रावणचेही नाव आहे. शोमध्ये रामचे पात्र हिमांशू सोनी यांनी तर शालीन भानोतने रावणाची भूमिका साकारली होती. हा कार्यक्रम कलर्स टीव्हीवर ५ ऑगस्ट २०१९ ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्रसारित झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा