Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘कितीतरी रात्री जागून…’, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली काजल अग्रवाल

‘कितीतरी रात्री जागून…’, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली काजल अग्रवाल

अलीकडेच अनेक अभिनेत्रींना आई होण्याचे सुख लाभले आहे. अशात दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालही (Kajal Aggarwal) आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने नील ठेवले. प्रेग्नेंसी दरम्यान तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्याला चाहत्यांनीही खूप प्रेम दिले. मात्र आई झाल्यानंतर पहिल्यांदाच काजलने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरं तर तिने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने पोस्ट पार्टम डिप्रेशनवरही मत व्यक्त केलं आहे.

काजलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझे बाळ नीलचे जगात स्वागत करताना मी खूप आनंद आणि उत्साही आहे.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “बाळाला जन्म देणे ही एक लांब, थकवणारी परंतु समाधान देणारी प्रक्रिया आहे. जन्मानंतर काही सेकंदांनी जेव्हा मी पहिल्यांदा नीलला माझ्या छातीवर घेतलं, तेव्हा या क्षणाचं शब्दात वर्णन करणं कठीण होतं. अर्थात सर्वकाही सोपे झाले नाही. किती रात्री झोप आली नाही आणि चिंता होती, पण नीलच्या जन्मानंतर सगळं बरोबर वाटत होतं. आता सकाळची सुरुवात मुलाला प्रेमाने मिठी मारून, एकमेकांच्या डोळ्यात पाहत, त्याची किस घेऊन होत आहे. आता आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत आहोत, पुढे जात आहोत, शिकत आहोत आणि या छान प्रवासात एकत्र पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. (kajal aggarwal expresses gratitude after becoming mother know what she said)

काजलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर साल २०२० मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत लग्न केले होते. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी निवडक पाहुण्यांमध्ये मुंबईत रेशीमगाठ बांधली.

काजलने ‘सिंघम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिने अजय देवगनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय अभिनेत्री लवकरच ‘आचार्य’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा