Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

केवळ शहनाजच नाही, तर सलमानने ‘या’ अभिनेत्रींचेही बनवले करिअर, टीव्हीवरून थेट मोठ्या पडद्यावर घेतली झेप

हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खानला (Salman Khan) त्याच्या दिलदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाते. त्याला बॉलिवूडमध्ये ‘यारों का यार’ असेही म्हटले जाते. तो नेहमी त्याच्या मित्रांना मदत करण्यास तयार असतो. सलमानच्या मित्रांनीही अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे. सलमान खानने आतापर्यंत अनेक नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहेत. त्याचा मित्र सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) असोत किंवा आदित्य पांचोलीचा (Aditya Pancholi) मुलगा सूरज पांचोली (Suraj Pancholi) असोत. स्टारकिड्सशिवाय सलमानने अनेक टीव्ही अभिनेत्रींनाही चित्रपटांमध्ये संधी दिली आहे. या यादीवर एक नजर टाकूया…

शहनाज गिल (Shehnaaz Gill)
‘बिग बॉस’मधून प्रसिद्ध झालेली शहनाज गिल पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली असली, तरी सलमानने तिला बॉलिवूडमध्ये मोठी संधी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज लवकरच ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिला आयुष शर्मासोबत (Ayush Sharma) कास्ट करण्यात आले आहे. (salman khan launched these tv actresses in movies)

रश्मी देसाई (Rashami Desai)
रश्मी देसाई सलमान खानच्या ‘दबंग २’मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती. याशिवाय ती ‘बिग बॉस १३’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या सीझनमध्ये सलमान तिला पूर्णपणे साथ देताना दिसला. शोमध्ये जेव्हा अरहान खानने रश्मीला धोका देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सलमानने सर्वांसमोर खुलासा केला होता की, अरहान आधीच विवाहित आहे. मात्र सलमानशी चांगली ओळख असूनही रश्मी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

अनिता हसनंदानी (Anita Hassanandani)
अनिता हसनंदानी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सलमान खानच्या चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्रींपैकी तीही एक आहे. अनिताने सलमानच्या होम प्रोडक्शनच्या ‘हीरो’ चित्रपटात काम केले होते. सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी यांचा हा पदार्पण चित्रपट होता. मात्र सलमान खानच्या चित्रपटात संधी मिळाल्यानंतरही ती मोठ्या पडद्यावर फारशी दिसली नाही. २०१६ मध्ये ती तेलुगु चित्रपट ‘मनालो ओक्कडू’मध्ये दिसली होती

महिमा मकवाना (Mahima Makwana)

अभिनेत्री महिमा मकवाना छोट्या पडद्यावर बालकलाकार म्हणून ‘सपने सुहाने लडकपन के’ आणि ‘बालिका वधू’ सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. सलमान खानने तिला त्याच्या चित्रपटात मोठा ब्रेक दिला. तिने ‘अंतिम’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमाननेही तिच्या अभिनयाचे अनेकदा कौतुक केले आहे. याशिवाय या चित्रपटातील तिची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. आता या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळते की, पुन्हा छोट्या पडद्यावर परतावे लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा